TRENDING:

मला अस्वस्थ वाटतंय! बिग बी अमिताभ बच्चन असं का म्हणाले, त्यांना काय झालंय?

Last Updated:
Amitabh Bachchan : एक अशी गोष्ट जी एकही दिवस केली नाही तर अमिताभ बच्चन यांना अस्वस्थ वाटतं. त्यांनी स्वत:च याबाबत सांगितलं आहे.
advertisement
1/9
मला अस्वस्थ वाटतंय! बिग बी अमिताभ बच्चन असं का म्हणाले, त्यांना काय झालंय?
बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. आपले विचार, मतं, भावना ते सोशल मीडियावर व्यक्त करत असतात. नुकताच त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. ज्यात त्यांनी आपल्या अशा एका सवयीबाबत सांगतिलं आहे, जी त्यांना वयाच्या 83 व्या वर्षीही आहे.
advertisement
2/9
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांना विचित्र, अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं आहे. एक गोष्ट जी न केल्याने त्यांची चिंताही वाढत असल्याचं ते म्हणाले. याबाबत त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे.
advertisement
3/9
नुकताच त्यांनी 'कौन बनेगा करोडपती'चा 17 वा सीझन पूर्ण केला. शेवटच्या एपिसोडमध्ये ते खूप भावुक झालेले दिसले. फिल्मचं म्हणायचं तर ते शेवटचे 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिसले होते. आता त्यांनी 'कल्की 2'चं शूटिंगही पूर्ण केलं आहे. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ज्यात ते कमल हसन यांच्यासोबत दिसले.
advertisement
4/9
अमिताभ यांना आता कुठे थोडासा ब्रेक मिळाला. पण त्याला ते कंटाळले आहेत. ते म्हणाले, मी घरी रिकामी बसलो आहे आणि मला अस्वस्थ वाटतं आहे.
advertisement
5/9
बिग बी यांनी लिहिलं, "दिवस पूर्णपणे आळसाचा होता. यामागे काही विशिष्ट कारण नव्हतं. पण दररोज काम न करणं विचित्र वाटतं. जेव्हा तुम्ही दररोज एका ठरलेल्या वेळी काम करता, तेव्हा हळूहळू ती सवय होऊन जाते. पण जेव्हा एके दिवशी ती सवय मोडते, तेव्हा संपूर्ण दिवसच विचित्र वाटू लागतो"
advertisement
6/9
"सर्व काही विस्कळीत वाटत आहे. ज्या गोष्टी पूर्वी आपोआप होत असत, त्या आज घडत नाहीत. आजचा दिवस असा का आहे? सामान्य का वाटत नाही? असा प्रश्न आपल्याला पडतो", असं ते म्हणाले.
advertisement
7/9
अमिताभ यांनी पुढे याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचं म्हटलं. ते म्हणाला, "काही लोकांना यामुळे शांती मिळत नाही. उलट त्यामुळे त्यांची चिंता वाढते. सततची चिंता मेंदू आणि शरीर या दोघांसाठीही खूप हानिकारक आहे. म्हणूनच दिवसभर विनाकारण चिंता करत राहण्याची अजिबात गरज नाही."
advertisement
8/9
अमिताभ बच्चन बॉलिवूडचे 'शहेनशाह' गेल्या सहा दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत अविरतपणे कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कामातून मोठं यश मिळवलं आहे. मात्र त्यांची कामाची भूक आजही कमी झालेली नाही, हेच त्यांच्या पोस्टमधून समजतं
advertisement
9/9
म्हणूनच अमिताभ बच्चन आजही चित्रपट निर्मात्यांचे आवडते आहेत. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे आजही प्रत्येक मोठ्या चित्रपटात त्यांची भूमिका असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मला अस्वस्थ वाटतंय! बिग बी अमिताभ बच्चन असं का म्हणाले, त्यांना काय झालंय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल