TRENDING:

AC लावण्याचं बजेट नाही? मग टेन्शन कसलं घेताय, या स्मार्ट ट्रिकने गारेगार ठेवा घर

Last Updated:
Cooling Tips Without AC: देशातील अनेक भागांमध्ये तापमान 40 डिग्री सेल्सियसहून जास्त झालयं. ज्यामुळे लोकांना घरात राहणंही कठीण झालंय. अशावेळी एसी उपयुक्त ठरतात. पण तुमचं एसी घेण्याचं बजेट नसेल तर डोंट वरी, पाहूया सोप्या ट्रिक्स...
advertisement
1/8
AC लावण्याचं बजेट नाही? मग टेन्शन कसलं घेताय, या स्मार्ट ट्रिकने गारेगार ठेवा घर
मुंबई : उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एयर कंडीशनर हे अनेक लोकांची पहिली पसंत आहे. पण प्रत्येकालाच हे परवडेल असं नाही. कारण एसी खरेदी करणे इंस्टॉल करण्यासाठी मोठा खर्च लागतो. यासोबतच याचं वीज बिलही खुप जास्त असतं. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडू शकतो. अशावेळी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करुन कमी खर्चात तुमचं घर कसं गारेगार ठेवू शकता पाहूया. तसंच वीज बिलाचा भारही तुमच्यावर पडणार नाही.
advertisement
2/8
काही सिंपल टिप्स : खिडकीजवळ ओले पडदे लावा. ज्यामुळे खिडकीतून येणारी हवा गार येईल. तुम्ही एखादी चटई ओली करुनही येथे लावू शकता. यासोबतच कूलरमधून कूलकूल हवा यावी म्हणून त्यात बर्फ टाका.
advertisement
3/8
एयर कूलर, मीडल क्लाससाठी बेस्ट : भारतात कूलर आजही सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. कारण हे स्वस्त आहेत, याचं मेंटेनेंसही सोपंय आणि वीजही कमी लागते. यामुळे कमी खर्चात तुमची खोली गारेगार होते. फक्त कूलर ऑन केल्यावर खोलीत व्हेंटिलेशन हवंय, घरात ताजी हवा येण्यासाठी जागा असायला हवी.
advertisement
4/8
BLDC पंखे घ्या : जुने फॅन बदलून तुम्ही BLDC पंखे लावा. यामुळे वीज बचत होते. सोबतच हवाही वेगाने येते. तुम्ही एकटेच खोलीत राहत असाल तर टेबल किंवा पेडेस्टल फॅनचा वापर करू शकता. जो हवा थेट तुमच्याकडे फेकते, ज्यामुळे उष्णतेपासून तत्काळ दिलासा मिळतो.
advertisement
5/8
एग्जॉस्ट फॅन : खोलीमध्ये कधी-कधी दमटपणा जाणवतो. कारण हवा एकाच ठिकाणि थांबते. अशावेळी एग्जॉस्ट गरम हवा बाहेर काढण्याचं काम करते. ज्यामुळे घरात फ्रेश हवा राहते. घरातील जी खोली सर्वात जास्त उष्ण असते त्यात एग्जॉस्ट फॅन लावा.
advertisement
6/8
पोर्टेबल स्वस्त एसी : तुम्हाला इंस्टॉलेशचं टेन्शन नको असेल. तर पोर्टेबल एसी घेऊ शकता. हे स्वस्तही असते. ते एका खोलीतून दुसऱ्या खोलीत घेऊन जाऊ शकता. सामान्य एसीपेक्षा हे स्वस्त असतात, पण कूलरपेक्षा महाग असतात. पण भाड्याने राहणाऱ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
7/8
व्हेंटिलेशनची योग्य वेळ : सुर्य मावळल्यानंतर रात्री आणि सकाळी लवकर खिडक्या ओपन करा. जेणेकरुन गार हवा आत येऊ शकेल. दुपारी पडदे बंद ठेवा ज्यामुळे ऊन आत येणार नाही.
advertisement
8/8
पॉवर बॅकअप आणि स्मार्ट सवयी :उष्णतेत वीज कपात ही सामान्य असते. एकचांगला इन्व्हर्टर किंवा सोलर पॅन बसवा. ज्यामुळे पंखे आणि कूलर चालू राहतील. सोबतच घरात उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांचा कमी वापर करा. म्हणजेच ओव्हन किंवा जास्त लाइट्स. फिकट रंगाचे पडदे आणि फिकट रंग हे उष्णता कमी करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
AC लावण्याचं बजेट नाही? मग टेन्शन कसलं घेताय, या स्मार्ट ट्रिकने गारेगार ठेवा घर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल