WhatsApp companion mode: एक दोन नाही 4 डिव्हाइसवर चालणार WhatsApp, कसं वापरायचं पाहा सोपी ट्रिक
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
WhatsApp companion mode मुळे आता एकाच नंबरवर चार डिव्हाइसवर लॉगइन करता येईल, पण फ्रॉड्स वाढण्याचा धोका देखील आहे. सेटिंगमध्ये डिव्हाइस लिंकचा पर्याय वापरावा लागेल.
advertisement
1/7

आजकाल WhatsApp शिवाय दुसरं माध्यम नाही अशी अवस्था झाली आहे. अगदी घरच्या सामानाची यादी, ते फ्रेण्डसोबत गप्पा इतकंच नाही तर व्हिडीओ कॉल, पेमेंट करणं अगदी सगळं सगळं एका WhatsApp वरच वापरलं जातं. पण एक अडचण होते, एका ठिकाणी लॉगइन केलं की दुसरीकडून WhatsApp लॉगआऊट होतं.
advertisement
2/7
आता या सगळ्याचं टेन्शनच राहणार नाही. याचं कारण म्हणजे आता एकावेळी चार डिव्हाइसवर WhatsApp लॉगइन करता येणार आहे. हे फीचर तुम्ही वापरल्यानंतर चार ठिकाणी लॉ़गइन करु शकणार आहात. त्यामुळे तुम्हाला सतत लॉगइन करण्याची कटकट वाचणार आहे.
advertisement
3/7
WhatsApp companion mode असं एक फीचर देण्यात आलं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डिव्हाइस लिंकचा पर्याय आहे तिथे हा पर्याय मिळणार आहे. एकावेळी तुम्ही चार डिव्हाइसवर WhatsApp वापरू शकणार आहात. एकाच नंबरवरुन तेही, मात्र यामुळे फ्रॉड्स वाढण्याचा देखील धोका निर्माण होऊ शकतो.
advertisement
4/7
तुम्हाला WhatsApp मध्ये उजव्या कोपऱ्यात तीन डॉट आहेत तिथे क्लिक करावं लागेल. तिथे लिंक डिव्हाइस असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे. तिथे स्कॅन करण्याचा पर्याय येईल तो पर्याय निवडा. क्यूआर कोड स्कॅन करा.
advertisement
5/7
WhatsApp चं हे फीचर तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरही वापरू शकता. त्यासाठी WhatsApp वेब किंवा App वापरावं लागेल. तिथेही हीच प्रक्रिया करायची आहे. तुम्ही अगदी सहज वापरू शकता.
advertisement
6/7
फोनवर तुम्हाला WhatsApp सुरू करायचं आहे. लॉगइन करायचं आहे. तिथे कंपॅनियन मोडचा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय तुम्हाला उजव्या कोपऱ्यात तीन डॉट आहेत तिथे मिळणार आहे. तिथे क्यूआर कोड दिसेल तो स्कॅन करायचा आहे.
advertisement
7/7
या कोडला तुम्हाला प्रायमरी फोनमधून लिंक डिव्हाइसचा पर्याय द्यायचा आहे. तो दिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या फोनमध्ये WhatsApp लॉगइन करु शकणार आहात. यासाठी तुम्हाला प्रत्येकवेळी नंबर टाकण्याची आवश्यकता नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WhatsApp companion mode: एक दोन नाही 4 डिव्हाइसवर चालणार WhatsApp, कसं वापरायचं पाहा सोपी ट्रिक