Kathmandu Bus Accident: 35 प्रवाशांनी भरलेली बस थेट मध्यरात्री नदीत कोसळली, 18 जणांचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Kathmandu Bus Accident: नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात त्रिशूली नदीत बस कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला. पोखराहून काठमांडूला जात असताना अपघात झाला. बचावकार्यात नेपाळी आर्मी सहभागी.
advertisement
1/7

मध्यरात्रीची वेळ, किर्रर्र काळोळ कुणी गाढ झोपी गेलं होतं तर कुणी फोनवर चॅटिंग करण्यात तर कुणी सिनेमा, व्हिडीओ पाहण्यात दंग होतं. प्रवाशांनी पूर्ण बस भरलेली होती, अचानक काही कळण्याच्या आतच ही बस पाण्यात कोसळली, प्रवाशांना काही समजायच्या आत जलसमाधी मिळाली.
advertisement
2/7
नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री एक भीषण बस दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस थेट त्रिशूली नदीच्या खोल पात्रात कोसळली असून, या भीषण अपघातात १८ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
advertisement
3/7
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने निघाली होती. रात्री दीडच्या सुमारास बस धादिंग जिल्ह्यातील बेनिघाट रोरांक परिसरात आली असता, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. काही कळायच्या आतच ही बस रस्त्यावरून घसरली आणि थेट त्रिशूली नदीच्या पात्रात कोसळली.
advertisement
4/7
काळोख आणि खोल पाणी यामुळे मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या प्रवाशांचे आवाजही या भीषण अपघातात विरून गेले. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये एका पुरुष आणि एका महिला अशा दोन परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे, मात्र त्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
advertisement
5/7
सुरुवातीला १७ मृतदेह सापडले होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना आणखी एका गंभीर जखमी प्रवाशाचा मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. हायवे रेस्क्यू मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष राजकुमार ठाकुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये ३५ हून अधिक प्रवासी होते.
advertisement
6/7
रात्रीचा भीषण काळोख असल्यामुळे बचावकार्यात प्रचंड अडथळे येत होते. तरीही नेपाळी आर्मी, सशस्त्र पोलीस दल आणि स्थानिक नागरिकांनी जिवाची बाजी लावून नदीच्या पात्रातून २५ जखमींना बाहेर काढले. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
7/7
धादिंग ट्रॅफिक पोलीस प्रमुख शिशिर थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा. मात्र, अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Kathmandu Bus Accident: 35 प्रवाशांनी भरलेली बस थेट मध्यरात्री नदीत कोसळली, 18 जणांचा मृत्यू