भारतात इथे आहे लोकांना मालामाल करणारा डोंगर; पावसाळ्यात याच्या पायथ्याशीच थांबतात गावकरी, अनोखी कहाणी
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
advertisement
1/6

बिहारच्या गयामध्ये एक पर्वत आहे ज्याला मोत्यांचा पर्वत म्हणतात. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाच्या पाण्याबरोबरच या डोंगरातून मौल्यवान मोती आणि प्रवाळ देखील बाहेर पडतात आणि जेव्हा ते एखाद्याला सापडतात तेव्हा तो माणूस मालामाल होतो. बोधगया आणि इतर राज्यांतूनही खरेदीदार येथे सापडणारे मोती विकत घेण्यासाठी येतात आणि मोती आणि प्रवाळानुसार त्यांची खरेदी करतात.
advertisement
2/6
5 हजार ते 50 हजार रुपये किमतीचे छोटे मौल्यवान मोती आणि रत्नांची येथे विक्री झाल्याचं सांगण्यात येतं. हे पर्वत गया जिल्ह्यातील वजीरगंज ब्लॉकमधील हंसराज आणि सोमनाथ टेकड्या आहेत. दोन्ही टेकड्या एकमेकांना लागून असून या टेकडीच्या खाली हसरा गाव वसलेलं आहे. येथे मुसळधार पाऊस पडला की डोंगराच्या पायथ्यापासून मोती बाहेर पडतात. मोती गावाकडे वाहतात आणि शेतात जातात.
advertisement
3/6
या भागातील जनता पावसाची आतुरतेनं वाट पाहत असते. यावेळी येथील ग्रामस्थ इथेच उभे राहतात आणि आपली जागा सोडत नाही. मात्र, मोती शोधणं इतकं सोपं नाही आणि ते सहज सापडत नाही. पण, जो मेहनत करतो त्याला तो नक्कीच मिळतो. येथील लहान मुलं आणि तरुणांनाही हे मोती मिळतात.
advertisement
4/6
या पर्वताच्या गर्भात मौल्यवान खडे आणि दगड असल्याचं येथील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर या पर्वतावर आठ धातूची शिल्पे असल्याचं सांगितलं जातं. या पर्वताच्या आत अमूल्य संपत्ती आहे. हंसराज पर्वताभोवती राजाच्या राजवाड्याचे अवशेष आहेत, जो पूर्वी राजा महाराजांचा राजवाडा होता असं मानलं जातं. त्याचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत.
advertisement
5/6
मात्र, बहुतांश लोक मोती लपवून ठेवतात. पूर्वी येथे ज्वेलर्स स्वत: गावात येत असत. ते अजूनही येतात, पण आता गावकरी स्वत: मोत्यांची किंमत शोधून चढ्या भावाने विकतात.
advertisement
6/6
खसरा गावातील ग्रामस्थ सांगतात की, पाऊस पडला की डोंगरावरून मोती पडतात. डोंगरावरील मोती गावाकडे आणि शेतात वाहून येतात. शेतकरी शेत नांगरतात तेव्हा त्यांना मोती सापडतात. गावकरीही मोठ्या मेहनतीने याचा शोध घेतात. बरेच लोक धाग्याच्या साहाय्याने गळ्यात हे मोती बांधतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
भारतात इथे आहे लोकांना मालामाल करणारा डोंगर; पावसाळ्यात याच्या पायथ्याशीच थांबतात गावकरी, अनोखी कहाणी