28 जानेवारीचं प्लेन क्रॅशचं भाकित केलेल्या ज्योतिषाची पुढची भविष्यवाणी ऐकलीत का? तुमची झोप उडेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Plane Crash Prediction : 28 जानेवारीच्या प्लेन क्रॅशची भविष्यवाणी करणाऱ्या याच ज्योतिषाने पुढची भविष्यवाणीही केली आहे. त्याची एक भविष्यवाणी खरी ठरल्यानंतर आता त्याच्या पुढच्या भविष्यवाणीबाबत भीती निर्माण झाली आहे.
advertisement
1/5

28 जानेवारीला अजित पवारांचा बारामतीत प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. पण 28 जानेवारीला प्लेन क्रॅश होणार अशी भविष्यवाणी एका ज्योतिषाने केली होती आणि ती खरी ठरली. त्याने यापुढचीही भविष्यवाणी केली आहे.
advertisement
2/5
ज्योतिषाची पुढची भविष्यावाणीही प्लेन क्रॅशची आहे. ज्योतिषाने सांगितल्यानुसार 28 जानेवारीपासून जर तुम्ही विमान तिकीटं बुक केली असतील तर ती कॅन्सल करा, कारण प्लेन क्रॅशचा धोका आहे. असं या ज्योतिषाचं नाव आहे.(प्रतीकात्मक फोटो)
advertisement
3/5
जवळपास एक वर्षापूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 28 जानेवारीला प्लेन क्रॅश होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तसंच अनेक पॉडकास्टवरही आपल्या या भविष्यवाणीवर ते ठाम राहिले. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
4/5
अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्या ज्योतिषाने पुन्हा आपला व्हिडीओ पोस्ट करत आपली भविष्यवाणी खरी ठरल्याचं सांगितलं. त्याने याआधी केलेल्या भविष्यवाणीचे पुरावेही दिले आहेत. तसंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आधीचे व्हिडीओही आहेत. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
5/5
दरम्यान सुमिताचार्य यांच्या भविष्यवाणीत उत्तर-पूर्व दिशेचा उल्लेख आहे. त्यामुळे ही भविष्यवाणी बारामतीतील घटनेला लागू होत नाही, असं नेटिझन्सनी म्हटलं आहे. दरम्यान ज्योतिषाने केलेली ही भविष्यवाणी फक्त माहितीसाठी देण्यात आली आहे. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही. (प्रतीकात्मक फोटो)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
28 जानेवारीचं प्लेन क्रॅशचं भाकित केलेल्या ज्योतिषाची पुढची भविष्यवाणी ऐकलीत का? तुमची झोप उडेल