Realme 16 5g फोनचा सेल आजपासून सुरू! मिळते 7000mAh बॅटरी, पण किंमत किती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
रियलमीचे एकापेक्षा एक फोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आजपासून Realme 16 5G फोनचीही भारतात विक्री सुरू झालीये. चला पाहूया या फोनमध्ये काय खास आहे.
advertisement
1/7

भारतात रियलमीचे फोन मोठ्या प्रमाणात वापरले जातात. कंपनीने नवीन रियलमी 16 सीरीजचा तिसरा मॉडल रियलमी 16 5G नुकताच लॉन्च केला होता. 2 एप्रिल रोजी लॉन्च केलेला हा फोन आता आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनीने या फोनला दमदार बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि प्रीमियम फीचर्ससह लॉन्च केलाय. ज्यामुळे हा मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक मजबूत ऑप्शन ठरतो.
advertisement
2/7
रियलमी 16 5G चा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 31,999 रुपयांत उपलब्ध आहे. तसंच 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आणि टॉप मॉडल 12GB + 256GB ची किंमत 36,999 रुपये ठेवली आहे. ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना ईएमआय ट्रांझेक्शनवर 3,000 रुपयांपर्यंत इंस्टंड डिस्काउंट मिळू शकतं.
advertisement
3/7
यासोबतच बँक आणि यूपीआयच्या माध्यमातून 2 हजार रुपयांपर्यंत सूट आणि 1 हजार रुपयांचं एक्सचेंज बोनसही दिलं जातंय. हा फोन एयर ब्लॅक आणि एयर व्हाइट कलर ऑप्शनमध्ये फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या ऑनलाइन स्टोरवर उपलब्ध आहे.
advertisement
4/7
फोनचे सर्व फीचर्स आहेत भारी : स्पेसिफिकेशन्सविषयी बोलायचं झाल्यास, रियलमी 16 5G मध्ये 6.57 इंचांचा फूल HD+ AMOLED डिस्प्ले दिलाय. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सँपलिंग रेटसह येतो. हा डिस्प्ले 4,200 पर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. ज्यामुळे तीव्र उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते.
advertisement
5/7
परफॉर्मेंससाठी यात MediaTek Dimensity 6400 Turbo चिपसेट दिलाय. जो 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. फोनमध्ये वेपर चेंबर कूलिंग सिस्टमही दिलीये. ज्यामुळे जास्त वापरादरम्यान डिव्हाइस जास्त गरम होत नाही. सोबतच IP69 रेटिंगसह हा फोन येतो. ज्यामुळे तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो.
advertisement
6/7
कॅमेराविषयी बोलायचं झाल्यास, यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 2MP चा मोनोक्रोम सेन्सर दिलाय. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
advertisement
7/7
फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची 7,000mAh बॅटरी आहे. जी 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी दीर्घकाळ चालण्यासाठी डिझाइन केलीये. ज्यामुळे यूझर्सला वारंवार फोन चार्जिंगला लावायचं टेन्शन नाही. ज्या लोकांना दमदार बॅटरी, शानदार डिस्प्ले आणि मजबूत परफॉर्मेंसचा 5G स्मार्टफोन हवा आहे त्यांच्यासाठी रियलमी 16 5G बेस्ट ऑप्शन आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Realme 16 5g फोनचा सेल आजपासून सुरू! मिळते 7000mAh बॅटरी, पण किंमत किती?