TRENDING:

Do You Know : कोणत्या देशाला म्हणतात ‘छोटा भारत’? कॅनेडा किंवा अमेरिका नाही तर हा देश कोणता तिसराच

Last Updated:
अनेक देशांमध्ये लंडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश होतो, पण या सगळ्यांमध्ये एक देश असा आहे ज्याला ‘छोटा भारत’ म्हटलं जातं तुम्हाला माहितीय का ते कोणतं?
advertisement
1/6
कोणत्या देशाला म्हणतात ‘छोटा भारत’? कॅनेडा किंवा अमेरिका नाही तर हा कोणता तिसराच
जगभरातील प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती, परंपरा आणि ओळख असते. पण काही देश असेही आहेत, जिथे भारताचा रंग, सुगंध आणि संस्कृती आजही जाणवते. भारताबाहेरही लाखो भारतीय वेगवेगळ्या देशांत स्थायिक झाले आहेत. काही नोकरीसाठी, काही शिक्षणासाठी, तर काही ऐतिहासिक कारणांमुळे. त्यामुळेच जगातील अनेक ठिकाणी भारतीय संस्कृती, सण आणि खाद्यसंस्कृतीचं सुंदर दर्शन घडतं.
advertisement
2/6
अशा अनेक देशांमध्ये लंडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश होतो, पण या सगळ्यांमध्ये एक देश असा आहे ज्याला ‘छोटा भारत’ म्हटलं जातं तुम्हाला माहितीय का ते कोणतं?
advertisement
3/6
तो देश म्हणजे फिजी (Fiji). फिजी हा दक्षिण प्रशांत महासागरातील लहानसा पण सुंदर द्वीपसमूह आहे. आज तो केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर भारतीय संस्कृतीच्या जतनासाठीदेखील प्रसिद्ध आहे. या देशाचं भारताशी असलेलं नातं शंभराहून अधिक वर्षं जुनं आहे.
advertisement
4/6
19व्या शतकात ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी भारतातून हजारो मजूर फिजीमध्ये ऊसाच्या शेतीसाठी नेले होते. हे मजूर प्रामुख्याने बिहार, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील भागांमधून आले होते.
advertisement
5/6
फिजीमध्ये स्थायिक झालेल्या या भारतीयांनी केवळ आपली भाषा आणि संस्कृतीच नाही, तर आपले सण-उत्सवही तिथे जिवंत ठेवले. आजही फिजीच्या रस्त्यांवर दिवाळीचे दिवे उजळतात, होळीचे रंग उधळले जातात आणि रामायण सप्ताह मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. हिंदी भाषा, भारतीय संगीत आणि पारंपरिक जेवण फिजीच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहेत.
advertisement
6/6
आज फिजीच्या लोकसंख्येपैकी सुमारे 30 टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी तिथल्या संस्कृतीत मिसळूनही भारतीय ओळख जपली आहे. म्हणूनच फिजीला आज जगभरात ‘छोटा भारत’ म्हणून ओळखलं जातं एक असं ठिकाण जिथे भारत हजारो किलोमीटर दूर असूनही मनात आणि संस्कृतीत जिवंत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Do You Know : कोणत्या देशाला म्हणतात ‘छोटा भारत’? कॅनेडा किंवा अमेरिका नाही तर हा देश कोणता तिसराच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल