गुडीपाडव्याला का बनवता 'श्रीखंड-पूरी'? आवडीने खातो पण यामागचं कारण अनेकांना माहित नसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गुडीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि कोणत्या ही नवीन गोष्टीची सुरुवात ही गोड पदार्थ खाऊनच करतात. शिवाय हा सण असल्यामुळे सहाजिकच गोड पदार्थ असणारच.
advertisement
1/6

गुडीपाडव्याला घराघरात श्रीखंड-पूरीचा बेत आखला जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की गुडीपाडव्याला श्रीखंड-पूरीच का बनवतात किंवा खातात.
advertisement
2/6
खरंतर पाडवा आणि श्रीखंड-पूरीचं वेगळंच नात आहे. शिवाय आयुर्वेदात श्रीखंडाला महत्व देखील आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
3/6
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण श्रीखंड हा खूप जुना पदार्थ आहे. श्रीखंडाचा उल्लेख हा महाभारतामध्ये सुद्धा आढळतो.
advertisement
4/6
श्रीखंडचा जन्म किंवा या नवीन पदार्था उगमच तेव्हा झाला असे म्हणतात. असं म्हणतात भीम जेव्हा बल्लव नामक आचाऱ्याच्या रुपात होता, तेव्हा त्याने हा पदार्थ स्वत: सगळ्यात आधी तयार केला.
advertisement
5/6
हा पदार्थ भगवान श्रीकृष्णाने सेवन केला. पण झाले असे की हा पदार्थ खाताच भगवान श्रीकृष्णाला झोप आली. यामुळे श्रीकृष्णाच्या पुढील दिनचर्येत खंड पडला म्हणून 'श्रीखंड' असे नाव या पदार्थाला देण्यात आले.
advertisement
6/6
पण प्रश्न असा की गुडीपाडव्यालाच 'श्रीखंड'ला महत्व का?गुढीपाडवा हा सण उन्हाळ्यात येतो. या काळात वातावरणात असलेल्या उष्णतेपासून शरीराला थंडावा आणि आराम मिळावा म्हणून श्रीखंड खाल्ले जाते. यामुळे शरीरातील शक्ती सुद्धा तग धरते. जाणकारांच्या मते ज्या व्यक्तीचे शरीर उन्हामुळे शुष्क झाले आहे, याच्या अंगात उर्जा नाही, उत्साह नाही त्या व्यक्तींचे शरीर श्रीखंड खाल्ल्यानंतर अगदी ताजेतवाने होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
गुडीपाडव्याला का बनवता 'श्रीखंड-पूरी'? आवडीने खातो पण यामागचं कारण अनेकांना माहित नसेल