TRENDING:

ही आहेत जगातील 10 महागडी चॉकलेट्स, एकाची किंमत तर 12 कोटी रुपये

Last Updated:
चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाचं आवडतं. जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मिळतात. यातील सर्वात जास्त महागडे चॉकलेट कोणते आहेत याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/10
ही आहेत जगातील 10 महागडी चॉकलेट्स, एकाची किंमत तर 12 कोटी रुपये
महागड्या चॉकलेट्सच्या यादीत पहिलं नाव आहे La Madeline au Truffe. हे निप्सचिल्ड नावाच्या कंपनीने तयार केलं आहे. ऑर्डर मिळाल्यानंतरच हे चॉकलेट बनवले जाते. एकदा ऑर्डर दिल्यानंतर, ते 14 दिवसांच्या आत विक्री केले जाते. हे दुर्मिळ मशरूमपासून बनवले जाते, ज्याची किंमत 80 ते 84 हजार रुपये प्रति किलो आहे.
advertisement
2/10
टोआक चॉकलेटचं हेदेखील महाग आहे. हे चॉकलेट 50 ग्रॅमच्या बारमध्ये येते. प्रत्येक बारची किंमत सुमारे 22 हजार रुपये आहे. जगात या चॉकलेटचे फक्त 574 बार अस्तित्वात आहेत. ते फक्त दोन गोष्टींपासून तयार केले जाते. उसाचा रस आणि कोको पावडर.
advertisement
3/10
DeLafée चे गोल्ड चॉकलेट महागड्या चॉकलेटपैकी एक आहे. हे चॉकलेट स्विस सोन्याच्या नाण्यासोबत येते. एका बॉक्समध्ये 24 कॅरेट खाण्यायोग्य सोन्यापासून बनवलेल्या आठ चॉकलेट्स असतात. याशिवाय सोबत एक प्राचीन सोन्याचे नाणेही दिले आहे. त्याची किंमत 33 हजार रुपये प्रति बॉक्स आहे. सोने खावेसे वाटत नसेल तर हे चॉकलेट चांदीतही मिळते.
advertisement
4/10
Debauve & Gallais Le livre हे एक फ्रेंच चॉकलेट आहे जे सोन्याचा मुलामा असलेल्या बॉक्समध्ये पॅक केलेले असते. त्याच्या आत 35 चॉकलेट्स आहेत, जी हाताने तयार केली जातात. 35 चॉकलेट्सची किंमत 46 हजार रुपये आहे.
advertisement
5/10
2006 मध्ये, फोर्ब्सने नोकाच्या व्हिंटेज कलेक्शनला जगातील सर्वात महाग चॉकलेट घोषित केले. त्याच्या बॉक्सची किंमत 71 हजार रुपये आहे.
advertisement
6/10
कॅडबरी चॉकलेटसाठी तुम्ही 1,33,000 रुपये खर्च कराल का? विस्पा गोल्ड रॅप्ड चॉकलेटची ही किंमत आहे.
advertisement
7/10
स्वारोवस्की स्टडेड चॉकलेट्स हे बॉक्समध्ये पॅक केलेले लेबनीज चॉकलेट आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये 49 चॉकलेट्स आहेत. हे सोने आणि प्लॅटिनमने भरलेले आहे. 8 लाख 33 हजार रुपयांचे हे चॉकलेट आहे.
advertisement
8/10
गोल्डन स्पेकल्ड एग जगातील सात प्रसिद्ध चॉकलेट निर्मात्यांनी बनवले आहे. त्याची किंमत सुमारे नऊ लाख रुपये आहे. व्हेनेझुएलातून आयात केलेल्या खास चॉकलेटपासून ते बनवले जाते.
advertisement
9/10
सेरेंडिपिटी 3 नावाच्या रेस्टॉरंटने आपल्या मिठाईच्या यादीत फ्ररोजेन हाउट चॉकलेटचा समावेश करून जागतिक विक्रम केला. त्याची किंमत 21 लाख रुपये आहे.
advertisement
10/10
ले चॉकलेट बॉक्स हे जगातील सर्वात महाग चॉकलेट आहे. एका बॉक्सची किंमत 12 कोटी पन्नास लाख रुपये आहे. या बॉक्समध्ये तुम्हाला चॉकलेटसह हार, झुमके, अंगठ्या आणि ब्रेसलेट मिळतील, तेही हिरे आणि अनेक मौल्यवान दगडांनी बनवलेले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
ही आहेत जगातील 10 महागडी चॉकलेट्स, एकाची किंमत तर 12 कोटी रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल