TRENDING:

महाराष्ट्राला धडकी भरवणारं john cyclone, पण नाव कुणी ठरवलं?

Last Updated:
चक्रीवादळाला विशिष्ट नाव दिलं जातं. हे नाव कोण देतं आणि कसं ठरतं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चक्रीवादळाच्या नावाची स्टोरीही इंटरेस्टिंग आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्राला धडकी भरवणारं john cyclone, पण नाव कुणी ठरवलं?
मेक्सिकोमध्ये जॉन चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. त्याचवेळी उत्तर-पश्चिम आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. याचा परिणाम भारतावर आणि आसपासच्या देशांवरही देसून येणार आहे.
advertisement
2/7
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 30-40 किमी असेल, तर कमाल वेग 55 किमी प्रति तासापेक्षा जास्त असू शकतो. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह राज्यात आणि गुजरातच्या सीमेवर चक्रीवादळाचा प्रभाव पुन्हा एकदा दिसणार आहे.
advertisement
3/7
आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलं की, “चक्रीवादळ वाऱ्याचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे आज महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस पडेल. आम्ही कोकण गोवा, गुजरात प्रदेश आणि महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट दिला आहे. येत्या 48 तासात समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नयं असं आवाहन केलं आहे. तर समुद्रकिनाऱ्याजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे"
advertisement
4/7
पण तुम्ही पाहिलं असेल चक्रीवादळ आलं की त्याला एक विशिष्ट नाव दिलं जातं. ते कसं देतात? हे कोण ठरवतं? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? सुरुवातीला वादळांना कोणताही देश नावं देऊ शकत होता, मात्र त्यामुळे गोंधळ होऊ लागला नंतर, हवामानशास्त्रज्ञांनी अधिक संघटित आणि कार्यक्षम प्रणाली अंतर्गत एका यादीतून वादळांची नावं देण्याचा निर्णय घेतला.
advertisement
5/7
जागतिक मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन (ESCAP), 13-राष्ट्रीय संस्था जगभरात चक्रीवादळांना नाव देतात. या यादीत 13 देश आहेत. ज्यात  भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन यांचा समावेश आहे.
advertisement
6/7
अगदी सोप्या शब्दात समजून घ्यायचं तर चक्रीवादळाचं नाव ठरवणारा एक संघ आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. या संघातील प्रत्येक देश चक्रीवादळाचं नाव सुचवत असतो. अर्थात एका देशाला एकच नाव एकावेळी सुचवता येतं, नंतर दुसरा देश चक्रीवादळाला नाव देतो.
advertisement
7/7
हे नाव देण्यासाठी नियमावलीही तयार करण्यात आली आहे. आठ अक्षरांपेक्षा जास्त हे नाव असू नये. हे नाव लिंग, राजकारण, धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतींबाबत तटस्थ असतात. एकदा एखादं नाव वापरलं की ते पुन्हा वापरता येत नाही. याशिवाय हे नाव कोणत्याही देशाचा अपमान करणारे नसावे असंही यामध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
महाराष्ट्राला धडकी भरवणारं john cyclone, पण नाव कुणी ठरवलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल