जैन धर्मातील साधू का घालत नाहीत कपडे? दिगंबर आणि श्वेतांबर जैनमध्ये काय आहे फरक?
- Published by:Devika Shinde
- trending desk
Last Updated:
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असा ऋतू कोणताही असला तरी दिगंबर साधू कपडे परिधान करत नाहीत. असं का?
advertisement
1/7

जैन धर्मातले साधू त्यांच्या कठोर साधनेकरिता ओळखले जातात. ते त्यांच्या कठोर साधनेला अगदी देवाचा दर्जा देत असतात. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, जैन साधू कपडेही परिधान करत नाही. यामागे महत्त्वाचं कारण काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत जाणून घेऊ या.
advertisement
2/7
खरं तर जैन भिक्षूंचे दोन प्रकार आहेत. यामध्ये जे साधू पांढरे वस्त्र परिधान करतात, त्यांना 'श्वेतांबर' असे म्हणतात. जे वस्त्राशिवाय असतात त्यांना 'दिगंबर' म्हणतात. दिगंबर साधूंच्या कठोर प्रथेमध्ये कपड्यांशिवाय राहणं हेदेखील समाविष्ट आहे.
advertisement
3/7
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असा ऋतू कोणताही असला तरी दिगंबर साधू कपडे परिधान करत नाहीत. कितीही कडाक्याची थंडी असली तरी ते रजई किंवा उबदार कपडे परिधान करत नाहीत. ते नेहमी कपड्यांशिवाय असतात. अर्थात यामागे एक महत्त्वाचं कारण आहे.
advertisement
4/7
दिगंबर साधू कपड्यांशिवाय का राहतात? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आपण वस्त्राशिवाय जन्माला आलो, तर मग आपल्याला वस्त्रांची गरजच काय, अशी जैन साधूंची श्रद्धा आहे. मनुष्य स्वतःचे दोष झाकण्यासाठी कपडे घालतात. ज्याप्रमाणे मूल दुर्गुणांपासून दूर राहतं, त्याचप्रमाणे जैन ऋषीदेखील दुर्गुणांच्या पलीकडे असतात. या कारणास्तव त्यांना कपड्यांची गरज नाही, अशीही त्यांची श्रद्धा आहे.
advertisement
5/7
पृथ्वी नग्न आहे त्यामुळे दिगंबरही नग्न आहेत. कपडे परिधान केल्यानं त्यांच्या साधनेत अडथळा येऊ शकतो, अशीही दिगंबर साधूंची धारणा आहे. <a href="https://news18marathi.com/photogallery/maharashtra/washim-news-clash-between-two-jain-groups-at-shirpur-templ-mhpr-1180036.html">(हे ही वाचा : वाशिमच्या प्रसिद्ध जैन मंदिरात 2 पंथीयांमध्ये तुफान राडा! कुठे पडली ठिणगी? PHOTOS)</a>
advertisement
6/7
दरम्यान, भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, जैन अशा विविध धर्मांचे लोक राहतात. प्रत्येक धर्माला भारतामध्ये आदराचं स्थान दिलं जातं. तसंच प्रत्येक धर्माच्या परंपरेचा, रीतिरिवाजांचा आदर भारतामध्ये केला जातो. विविध धर्माचे सणदेखील भारतात साजरे केले जातात. हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्मामध्येही संत परंपरेला मोठं महत्त्व आहे.
advertisement
7/7
जैन धर्मामध्ये साधू परंपरा खूपच महत्त्वाची मानली जाते. दिगंबर साधूंचं आचरण अतिशय कडक असतं. दिगंबर मुनींनी वस्त्र परिधान न करण्याची परंपरा अनादि काळापासून चालत आलेली आहे. ही परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. या परंपरेला जैन धर्मामध्ये मोठं महत्त्व असून इतर धर्मातले लोकही तिचा आदर करताना दिसतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
जैन धर्मातील साधू का घालत नाहीत कपडे? दिगंबर आणि श्वेतांबर जैनमध्ये काय आहे फरक?