Olo Colour : ओलो कलर, असा रंग जो जगातील फक्त 5 लोकांनाच दिसला, असतो कसा?
- Published by:Priya Lad
Last Updated:
New Colour Olo : शास्त्रज्ञांच्या एका पथकाने असा नवीन रंग शोधल्याचा दावा केला आहे जो यापूर्वी कोणत्याही मानवाने पाहिला नाही. सायन्स अॅडव्हान्सेस जर्नलमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
advertisement
1/5

लाल, निळा, पिवळा हे प्रमुख कलर आहेत. या रंगांचं वेगवेगळ्या पद्धतीने मिश्रण करून बरेच रंग बनवता येतात. या रंगांची नावंही वेगवेगळी आहेत. पण आता शास्त्रज्ञांनी एक नवा रंग शोधून काढला आहे, जो आजवर कुणीच पाहिला नाही.
advertisement
2/5
अभ्यासात पाच जण सहभागी होते, चार पुरुष आणि एक महिला. त्याची रंग दृष्टी सामान्य होती. संशोधकांनी त्यांच्या डोळ्यांत लेसर पल्स टाकले. ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांची रेटिना नैसर्गिक क्षमतेपेक्षा अधिक उत्तेजित झाली आणि त्यांना एक नवा रंग दिसला. ज्याला त्यांनी ओलो असं नाव दिलं आहे.
advertisement
3/5
या संशोधनात सहभागींमध्ये एक होते कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक रेन एनजी जे या संशोधनाचे सहलेखकही आहेत. त्यांनी या संशोधनाला उल्लेखनीय असं म्हटलं आहे. प्रोफेसर एनजी म्हणाले, ओलो हा वास्तविक जगात दिसणाऱ्या कोणत्याही रंगापेक्षा जास्त संतृप्त आहे.
advertisement
4/5
आता हा रंग दिसतो कसा हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या जर्नलमध्ये हा संशोधनाबाबत माहिती देण्यात आली आहे. हा रंग पाहिलेल्यांनी शास्त्रज्ञांनी तो निळा-हिरवा दिसतो असं म्हटलं. पण ते स्पष्टपणे वर्णन करू शकले नाहीत.
advertisement
5/5
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे निकाल रंगांधळेपणाच्या संशोधनाला चालना देऊ शकतात. प्राध्यापक एनजी यांनी कबूल केलं की ओलो तांत्रिकदृष्ट्या पाहणं खूप कठीण आहे, तरी रंगांधळे असलेले लोक ज्यांना विशिष्ट रंगांमध्ये फरक करणं कठीण वाटतं. त्या लोकांसाठी याचा काय अर्थ असू शकतो हे पाहण्यासाठी टीम निष्कर्षांचा अभ्यास करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Olo Colour : ओलो कलर, असा रंग जो जगातील फक्त 5 लोकांनाच दिसला, असतो कसा?