TRENDING:

ओ तेरी! विमानाने टेक ऑफ केलं आणि 2026 मधून 2025 सालात लँड झालं, कसं काय?

Last Updated:
Plane Take off in 2026 land in 2025 : 2026 वर्षांचं सेलिब्रेशन करून तुम्ही विमानात बसलात आणि 2025 सालात पोहोचलात तर... अशक्य वाटणाऱ्या या टाइम ट्राइव्हलचा अनुभव अनेक विमान प्रवाशांनी घेतला.
advertisement
1/5
ओ तेरी! विमानाने टेक ऑफ केलं आणि 2026 मधून 2025 सालात लँड झालं, कसं काय?
कल्पना करा... तुम्ही विमानात बसला आहात, नवीन वर्ष साजरं केलं आहे आणि काही तासांनी तुम्ही विमानातून उतरता तेव्हा 2026 मधून पुन्हा 2025 सालात पोहोचचा. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला काही आंतरराष्ट्रीय विमानांनी असा अनोखा टाइम ट्रॅव्हल केला आहे, ज्यामुळे सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत.
advertisement
2/5
ख्रिसमस, न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बरेच लोक परदेशात गेले. विमानाने प्रवास केला आणि अनेक जण नव्या वर्षातून पुन्हा जुन्या वर्षात गेले. 2026 हे नवीन वर्ष येताच विमान प्रवाशांना एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं.  रेषा आणि वेळ यांच्या जादुई खेळामुळे हा चमत्कार शक्य झाला.
advertisement
3/5
एव्हिएशन डेटा कंपनी सिरियम डिओच्या मते, 31 डिसेंबर रोजी रात्री 11.59 पर्यंत 111 प्रवासी विमानं त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी उतरली, त्यापैकी 89 विमाने एकट्या अमेरिकेत उतरली.
advertisement
4/5
काही विमाने 1 जानेवारी रोजी अगदी रात्री 00.00 वाजता निघणार होती, ज्यात इजिप्तहून सौदी अरेबियाला जाणारी एअर अरेबियाची विमानंदेखील होती.
advertisement
5/5
सर्वात मनोरंजक कहाणी सात लांब पल्ल्याच्या विमानांची होती ज्यांनी 1 जानेवारी 2026 रोजी उड्डाण केलं होतं, पण टाइम झोनमधील फरकामुळे विमानाने 2025 मध्ये लँड झाली. यातील सर्वाधिक चर्चेत आलं ते स्टार्लक्स तैपेई-सॅन फ्रान्सिस्को विमान. जे 2026 मध्ये मध्यरात्रीनंतर उडालं आणि 2025 मध्ये उतरलं. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
ओ तेरी! विमानाने टेक ऑफ केलं आणि 2026 मधून 2025 सालात लँड झालं, कसं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल