Royal Enfield बुलेटची किंमत 1986 मध्ये किती होती? 'व्हायरल बिल' पाहून नेटकरीही Shocked
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Royal Enfield viral bill of 1987 : या बाईकच्या डिझाईनमध्ये काळानुसार बदल झाला असला तरी. मात्र, बाईकचे मूळ डिझाइन जवळपास सारखेच आहे.
advertisement
1/7

रॉयल एनफिल्ड बाईक घेण्याचं आजही अनेकांचं स्वप्न आहे. ही गाडी दिसायला तर दमदार आहेच, गुणवत्तेच्या बाबतीत देखील रॉयल एनफिल्डचं नाव आधी येतं. परंतू या बाईकच्या किमतीमुळे अनेकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहितीय का की ही कंपनी आता नाही मागच्या अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये तग धरुन आहे.
advertisement
2/7
सध्याच्या बुलेट 350 चे वजन 191 किलो आहे. ही गाडी 6 रंगांमध्ये उपलब्ध असेल असा कंपनीचा दावा आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक सुमारे 37 kmpl चा मायलेज देते.
advertisement
3/7
Royal Enfield Bullet 350 ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. ही बाईक अनेक दिवसांपासून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करत आहे. या बाईकच्या डिझाईनमध्ये काळानुसार बदल झाला असला तरी. मात्र, बाईकचे मूळ डिझाइन जवळपास सारखेच आहे. कदाचित त्यामुळेच लोकांचे या बाईकवरील प्रेम आजही बदललेले नाही
advertisement
4/7
बाईक प्रेमींना माहीत आहे की रॉयल एनफील्ड त्यांच्या बाईकचे फीचर्स अनेक वर्षांपासून अपडेट करत आहे. त्यामुळे लोकांमध्ये त्याची लोकप्रियता कायम आहे. फीचर अपडेटमुळे या मोटरसायकलच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. Royal Enfield Bullet 350 ची किंमत सध्या सुमारे 2.5 लाख रुपये आहे. त्यामुळे अनेकांना या बाईकची आवड असली तरी ती विकत घेणे परवडत नाही.
advertisement
5/7
काही दिवसांपूर्वी, 1986 मध्ये खरेदी केलेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे बिल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या बाईकची त्यावेळेची किंमत पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. बाईकची ऑन रोड किंमत केवळ 18,700 रुपये असल्याचे बिलात नमूद करण्यात आले आहे. बिल सुमारे 38 वर्षे जुने आहे. झारखंडमधील संदीप ऑटोच्या बुलेट 350 मॉडेलचे हे बिल आहे.
advertisement
6/7
रॉयल एनफिल्ड बुलेटला 1986 मध्ये एनफिल्ड बुलेट असे बोलले जायचे. तेव्हापासून ती एक विश्वासार्ह मोटरसायकल मानली जात आहे. रॉयल एनफिल्ड पोर्टफोलिओमधील ही सर्वात जुनी बाइक आहे. बुलेट सध्या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - बुलेट 350 आणि बुलेट 350 ES.
advertisement
7/7
रॉयल एनफिल्डचा दावा आहे की क्लासिक 350 प्रति लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 35-37 किमी मायलेज देईल. मात्र, प्रत्यक्षात ही बाइक 30-32 किमी प्रति लिटर पेट्रोल मिळवू शकते, असा दावा अनेकांनी केला आहे. मात्र, या बाईकप्रेमींनी त्या गाडीच्या मायलेजची कधीच पर्वा केली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Royal Enfield बुलेटची किंमत 1986 मध्ये किती होती? 'व्हायरल बिल' पाहून नेटकरीही Shocked