खरंच 'हा' साप जनावरांचं दूध पितो? घोड्यापेक्षा जास्त वेगाने पळतो? नेमकं सत्य काय?
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
धामण साप, ज्याला घोडा पछाड देखील म्हणतात, हा उन्हाळ्यात हजारीबागसारख्या जंगल परिसरात जास्त दिसतो. तो फार लांब आणि वेगवान असतो. अनेक गैरसमजांनुसार तो दूध पितो, पण...
advertisement
1/8

उन्हाळा सुरू झाला की, साप दिसणे ही साधारण गोष्ट आहे. अनेक ठिकाणी तर जंगलं खूप असतात. त्यामुळे वन्यजीव भरपूर प्रमाणात आढळून येतात. यात सापही असतात. हल्ली, रसेल वायपरनंतर अनेक ठिकाणी आणखी एक साप खूप दिसतोय.
advertisement
2/8
हा साप खूप लांब असतो. त्याची चालण्याची गती खूप जास्त असते. असं म्हणतात की, तो घोड्याला सुद्धा हरवू शकतो. या सापाबद्दल समाजात अनेक गोष्टी पसरलेल्या आहेत, ज्यामुळे लोकांच्या मनात भीती आहे. पण खरं काही वेगळंच आहे.
advertisement
3/8
या सापाला इंडियन रॅट स्नेक म्हणतात. स्थानिक भाषेत याला 'धामण' म्हणतात. हे साप माणसांच्या वस्तीजवळ नेहमी दिसतात. शेतात सुद्धा ते आढळतात. कारण उंदीर हे त्यांचं आवडतं जेवण आहे आणि ते त्याच शोधात फिरत असतात.
advertisement
4/8
'धामण' सापाबद्दल अशी समजूत आहे की, तो गाईचे पाय पकडतो आणि तिच्या कासेतून दूध पितो आणि तो घोड्यापेक्षाही वेगात धावू शकतो. पण वैज्ञानिक दृष्ट्या हे खरं नाही. उलट हा साप शेतकऱ्यांचा खरा मित्र मानला जातो.
advertisement
5/8
सर्पमित्र मुरारी सिंह सांगतात की, उन्हाळ्यात साप बाहेर येणे ही सामान्य बाब आहे. रसेल वायपरनंतर धामण सापांची संख्या जास्त आहे. बरेच लोक त्याला विषारी समजतात, पण तो बिनविषारी असतो. तो फण्यासारखा आकार करून धावण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे लोकांचा गोंधळ उडतो.
advertisement
6/8
ते पुढे म्हणाले, कोणताही साप दूध पित नाही. इंडियन रॅट स्नेक मुख्यत्वे उंदीर खातो. उंदरांच्या शोधात तो अनेकदा मानवी वस्तीत, विशेषतः जनावरांच्या गोठ्यांपर्यंत पोहोचतो. यामुळे गायी आणि इतर प्राणी घाबरतात आणि अनेकवेळा दूध देणे बंद करतात.
advertisement
7/8
यामुळेच अशी चुकीची समजूत पसरली आहे की, हा साप गायी किंवा म्हशीचे दूध पितो, पण खरं तर त्याची पचनसंस्था दूध पचवू शकत नाही आणि त्याला दूध पिण्याची शारीरिक क्षमताही नसते.
advertisement
8/8
पुढे ते म्हणाले, या सापाची भीती बाळगण्याची गरज नाही, पण त्याला त्रास देऊ नये. प्रशिक्षणाशिवाय त्याच्या जवळ जाणे धोकादायक असू शकते. तो उंदरांची शिकार करतो, ज्यामुळे पिकांचे कमी नुकसान होते. म्हणूनच त्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
खरंच 'हा' साप जनावरांचं दूध पितो? घोड्यापेक्षा जास्त वेगाने पळतो? नेमकं सत्य काय?