TRENDING:

Guess Who: बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल, निधनाच्या 24 तासात झालेली जीवंत! हनिमूननध्येच पतीला पाठवलेलं तुरुंगात

Last Updated:
Guess Who: बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयापेक्षाही तिचा बोल्ड अंदाज आणि अतरंगी कारनाम्यांमुळे जास्त चर्चेत आली.
advertisement
1/9
Guess Who: बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल, निधनाच्या 24 तासात झालेली जीवंत!
बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयापेक्षाही तिचा बोल्ड अंदाज आणि अतरंगी कारनाम्यांमुळे जास्त चर्चेत आली. तिची वक्तव्य, तिचे कारनामे, तिचे बोल्ड कपडे यांनी नेहमीच हेडलाइन्स बनवल्या. एक वेळ अशीही आली होती की तिच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशाला हादरवलेलं. मात्र तब्बल २४ तासांनंतर ती जीवंत असल्याचं समोर आलं.
advertisement
2/9
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सेन्सेशन क्वीन पूनम पांडे आहे. पूनमच्या चित्रपटांनी जितकी खळबळ उडवली नसेल, तितकी तिच्या स्टाईल अन् वक्तव्यांनी उडवली आहे. आज पूनम पांडेचा ३५ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील काही वादग्रस्त घटनांवर नजर टाकूया.
advertisement
3/9
११ मार्च १९९१ रोजी कानपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पूनमचा प्रवास एखाद्या थ्रिलर सिनेमासारखा आहे. मॉडलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या पूनमने २०११ च्या क्रिकेट वर्ल्ड कप वेळी एक विधान केलं होतं, ज्याने ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली.
advertisement
4/9
"भारत वर्ल्ड कप जिंकला तर मी न्यूड होईल," असं म्हणत तिने सर्वांच लक्ष वेधलं होतं. तिने ते केलं नसलं, तरी 'पब्लिक स्टंट' करण्यात तिचा हात कोणीही धरू शकत नाही हे त्यावेळी सिद्ध झालं.
advertisement
5/9
प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय करतील, याचा नेम नाही. पण पूनम पांडेने तर प्रसिद्धीसाठी थेट स्वतःच्या मृत्यूचाच बनाव रचला होता. एका रात्री बातमी येते की या पूनमचं निधन झालंय, संपूर्ण देश हळहळतो आणि अवघ्या २४ तासांच्या आत तीच पूनम कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणते, "मी जिवंत आहे."
advertisement
6/9
पूनमच्या करिअरपेक्षाही तिचं खाजगी आयुष्य अधिक धक्कादायक होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. २०२० साली तिने तिचा लाँग टर्म बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत थाटामाटात लग्न केलं खरं. पण लग्नाच्या अवघ्या ११ दिवसांमध्ये त्यांच्या नुकत्याच सुरू झालेल्या संसारात मिठाचा खडा पडला.
advertisement
7/9
पूनम आणि सॅम हनिमूनसाठी गोव्याला गेले असता तिथे असं काही घडलं की त्याला थेट तुरंगाची हवा खायला लागली. पूनमने सॅमवर मारहाण आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप केले होते. या हाय-प्रोफाईल ड्राम्यामुळे ही जोडी महिनाभर बातम्यांमध्ये झळकत होती.
advertisement
8/9
२०१७ साली पूनमने स्वतःचं एक मोबाईल अॅप लाँच केलं होतं, ज्यामध्ये ती तिचे बोल्ड फोटो आणि अडल्ट व्हिडीओ शेअर करायची. मात्र, अॅप लाँच झाल्यानंतर अवघ्या ६० मिनिटांमध्ये गुगल प्ले स्टोअरने दिला चांगलाच दणका दिला आणि ते अॅप प्लॅटफॉर्मवरून हटवलं. इतकंच नाही, तर गुगलने पॉलिसीचे उल्लंघन केल्याचे कारण देत तिला बॅन केलं.
advertisement
9/9
२०१३ मध्ये पूनमने 'नशा' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. सिनेमाच्या पोस्टरवरून मोठा वाद झाला होता आणि काही ठिकाणी तिचे पोस्टर्स जाळण्यात आले होते. त्यानंतर तिने 'खतरों के खिलाडी' आणि कंगना रणौतच्या 'लॉकअप' सारख्या रिॲलिटी शोमध्ये भाग घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल, निधनाच्या 24 तासात झालेली जीवंत! हनिमूननध्येच पतीला पाठवलेलं तुरुंगात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल