TRENDING:

8 फूट 3 इंचाचा सुलतान! जगातला सर्वात उंच माणूस, पण दररोज करावा लागतोय मोठा संघर्ष!

Last Updated:
तुर्कस्तानमधील 39 वर्षीय सुलतान कोसेन, 8 फूट 3 इंच (251 सेमी) उंचीसह जगातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहेत. त्यांच्या मेंदूतील...
advertisement
1/9
8 फूट 3 इंचाचा सुलतान! जगातला सर्वात उंच माणूस, पण दररोज करावा लागतोय संघर्ष
तो आपल्या घराच्या अंगणात उभा आहे आणि दुसऱ्या मजल्यावरील घराची खिडकी बंद करण्यासाठी हात वर करतो. त्याचे कपडे इतके मोठे आहेत की, त्यात दोन सामान्य माणसं सहज बसू शकतील. त्याचे हात आणि पाय इतके मोठे आहेत की त्याला खास ऑर्डर देऊन शूज बनवावे लागतात. तो सामान्य गाड्यांमधून प्रवास करू शकत नाही, ट्रेन किंवा बसमध्ये त्याला जागा मिळत नाही आणि तो इतका उंच आहे की सामान्य उंचीच्या दरवाज्यातून घरातही प्रवेश करू शकत नाही. तो आहे सुलतान कोसेन, जगातील सर्वात उंच माणूस.
advertisement
2/9
8 फूट 3 इंचाचा सुलतान! जगातला सर्वात उंच माणूस, पण दररोज करावा लागतोय संघर्ष
जगातील सर्वात उंच माणूस असलेल्या सुलतान कोसेनचं वय 39 वर्ष आहे. तो तुर्कस्तानमधील मार्डिन नावाच्या एका छोट्या गावात राहतो. सुलतानची उंची 8 फूट 3 इंच (251 सेंटीमीटर) आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात उंच माणूस म्हणून त्याची नोंद झाली आहे.
advertisement
3/9
सुलतान जगाचा विक्रमवीर असला तरी, त्याच्या अडचणी काही कमी नाहीत. तो सामान्य बस आणि गाड्यांमधून प्रवास करू शकत नाही. त्याला आपल्या घरीही जाता येत नाही. कारण, सामान्य उंचीच्या दरवाजातून त्याला आत प्रवेश करता येत नाही.
advertisement
4/9
सामान्य कपडे आणि बूट सुलतानच्या शरीराला फिट होत नाहीत. तो जेव्हा विमानाने प्रवास करतो, तेव्हा त्याला फर्स्ट क्लासचं तिकीट खरेदी करावं लागतं.
advertisement
5/9
कोणत्याही कंपनीने त्याला नोकरी दिली नाही. त्याला आपल्या कुटुंबासोबत गाडीतून कुठेही जाता येत नव्हतं. त्याचे कुटुंबीय बाहेर जायचे तेव्हा त्याला घरीच सोडून जायचे.
advertisement
6/9
सुलतानचा जन्म 1982 मध्ये झाला. तो इतका उंच का आहे? असं म्हणतात की, त्याच्या मेंदूमधील पिट्यूटरी ग्रंथीमध्ये एक छोटीशी गाठ आहे. हीच गाठ त्याच्या या प्रचंड आकृतीचं कारण आहे. त्याची वाढणारी उंची थांबवण्यासाठी तो उपचारासाठी अमेरिकेतही गेला होता.
advertisement
7/9
2010 मध्ये त्याने युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया मेडिकल स्कूलमध्ये उपचार सुरू केले. दोन वर्षांच्या उपचारानंतर त्याच्या वाढीच्या हार्मोन्सची पातळी नियंत्रित झाली. पण तोपर्यंत त्याची उंची 8 फूट 1 इंच झाली होती.
advertisement
8/9
सुलतानचं आयुष्य अडचणींशिवाय नव्हतं! त्याच्या उंचीमुळे लहानपणी कोणी त्याच्याशी मैत्री करत नव्हतं. तो पलंगावर झोपायचा तेव्हा त्याचे पाय बाहेर लटकत असत. लहानपणापासून त्याला कुठेही सहज प्रवास करता येत नव्हता कारण तो कोणत्याही गाडीत बसू शकत नव्हता. मात्र, सुलतानने हार मानली नाही. त्याने आतापर्यंत जगातील 128 देशांना भेटी दिल्या आहेत.
advertisement
9/9
सुलतानला जीवनसाथी शोधताना काही त्रास झाला नाही. त्याच्या उंचीमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हतं. अखेर ज्या महिलेने सुलतानला आपला पती म्हणून निवडलं, तिला फक्त अरबी भाषा येत होती. तिला तुर्की भाषा समजत नव्हती आणि बोलताही येत नव्हती. 2013 मध्ये सुलतानने त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या मर्वे डिबोसोबत लग्न केलं आणि एका वर्षानंतर तिने उंचीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
8 फूट 3 इंचाचा सुलतान! जगातला सर्वात उंच माणूस, पण दररोज करावा लागतोय मोठा संघर्ष!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल