TRENDING:

'या दिवशी सर्व नष्ट होणार; माणसं काय इतर जीवजंतूही नाही वाचणार', शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

Last Updated:
एक दिवस पृथ्वीवर सर्वकाही नष्ट होणार असं म्हटलं जातं. आता शास्त्रज्ञांनी त्या दिवसाची तारीखही सांगितली आहे.
advertisement
1/7
'या दिवशी माणसं काय इतर जीवजंतूही नाही वाचणार', शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा
पृथ्वी एक दिवस नष्ट होणार असं म्हटलं जातं. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर सिम्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर करत या संकटाच्या तारखेचा अंदाज वर्तवला आहे. नेचर जिओसायन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
advertisement
2/7
पृथ्वीवरील सर्व महाद्वीप मिळून एक सुपरकॉन्टिनेंटची निर्मिती करेल ज्याला पँजिया अल्टिमा म्हणून ओळखलं जाईल. धरतीचा बहुतेक भाग समुद्रात बुडेल. काही हजार वर्षांनी प्रत्येक महाद्विपांवर एक आग लागलेली असेल. हीच प्रलयाची सुरुवात असेल.
advertisement
3/7
टेक्टोनिस प्लेट्स आपसात धडकतील आणि ज्वालमुखीचे स्फोट होतील. यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइडचं जास्त उत्सर्जन होईल आणि पृथ्वी अधिक गरम होईल. सूर्याची किरणं आगीत तेलासारखं काम करतील. तेव्हा कार्बन डायऑक्साइडची पातळी आजपेक्षा दुप्पट असेल. श्वास घेणं कठीण होईल.
advertisement
4/7
पृथ्वी इतकी तापेल की सर्वकाही नष्ट होईल. त्यावेळी पृथ्वीवर जिवंत राहणाऱ्या कोणत्याही जीवाला 70 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागेल. हे सहन करण्याची क्षमता माणसात नसेल.
advertisement
5/7
या अभ्यासाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अलेक्झांडर फार्नस्वर्थ म्हणाले,  सामान्यपणे गरमीच्या दिवसात घाम निघून माणसाचं शरीर थंड रागतं पण तेव्हा असं होणार नाही. त्यामुळे शरीर इतकं गरम होईल की माणसाचा मृत्यू होईल.
advertisement
6/7
फक्त 8 ते 16 टक्के जमीन स्तनधाऱ्यांसाठी राहण्यायोग्य राहिल. पण त्यासाठी स्तनधारी जिवंतच नसतील. सर्व स्तनधारी प्रजाती नष्ट होतील.
advertisement
7/7
आजपासून 250 दशलक्ष वर्षांनंतर हे सर्वकाही घडेल. या अभ्यासात जीवाश्म इंधनाच्या ज्वलानमुळे तयार होणारं कार्बन डायऑक्साइडचा विचार केला नाही आहे. त्याचा विचार केला तर हे संकट खूप आधीच येईल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
'या दिवशी सर्व नष्ट होणार; माणसं काय इतर जीवजंतूही नाही वाचणार', शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल