प्रेग्नंट म्हणून आनंदी होती महिला, पण बाळाऐवजी पोटात वाढत होता 'मृत्यू'; रिपोर्ट पाहताच धक्का
- Published by:Priya Lad
Last Updated:
प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्यात ही महिला डॉक्टरांकडे गेली आणि सत्य समजताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
1/7

प्रेग्नन्सी प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाचा असा टप्पा. एकीकडे ती नव्या जीवाला जन्म देणार असल्याने आनंदी असते, तर दुसरीकडे तिच्या शरीरातील बदलांमुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/7
अमेरिकेतील अशीच एक महिला जी प्रेग्नंट झाली म्हणून आनंदी होती. पण ती पोटात बाळ समजून जे वाढवत होती ते प्रत्यक्षात बाळ नव्हे तर मृत्यूच होता. वाढलेल्या पोटाचं सत्य समजताच तिला धक्काच बसला.
advertisement
3/7
सारा लँड्री असं या महिलेचं नाव. अमेरिकेच्या कॅन्ससमध्ये राहणारी सारा जिला आधी एक मुलगा आहे. 2020 साली महासाथीदरम्यान ती प्रेग्नंट झाली. त्यावेळी बाहेर जाण्यावर निर्बंध असल्याने ती सुरुवातीच्या महिन्यात डॉक्टरांकडे गेली नाही. तिचं पोट वाढत होतं. पण तिला हे प्रेग्नन्सीचं लक्षण वाटलं.
advertisement
4/7
पण नंतर मात्र तिचं वजन कमी होऊ लागलं आणि तिला चिंता वाटू लागली. तीन महिन्यांनी ती डॉक्टरांकडे गेली. तिथं तपासणीत तिला याचं धक्कादायका कारण समजलं. सारा ज्या वाढलेल्या पोटाला बेबी बम्प समजत होती, ती प्रत्यक्षात तिच्या पोटात वाढत असलेली गाठ होती.
advertisement
5/7
साराला मोलर प्रेग्नन्सी होती. गर्भधारणेदरम्यान ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे ज्यामध्ये शुक्राणू अंड्याचं फलित करतात ज्यामध्ये काही समस्या आहे. यामुळे, मूल किंवा गर्भ तयार होण्याऐवजी, शरीरात ऊतक तयार होऊ लागतात जे ट्यूमरचं रूप घेतात.
advertisement
6/7
तिच्या गर्भाशयातून गाठ काढण्यात आली. ट्यूमर काढल्यानंतरही तिची प्रकृती ढासळतच राहिली. तिच्या शरीरात गाठ वेगवेगळ्या ठिकाणी वाढत राहिली आणि कॅन्सरचं रूप धारण केलं. तो कर्करोग तिच्या फुफ्फुसात आणि गर्भाशयापर्यंत पोहोचला.
advertisement
7/7
तिच्यावर अनेक केमोथेरपी झाली आणि त्यानंतर तिचं गर्भाशय काढून टाकण्यात आलं. आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. ती कॅन्सरपासून मुक्त आहे. पण आता तिला मूल होऊ शकत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
प्रेग्नंट म्हणून आनंदी होती महिला, पण बाळाऐवजी पोटात वाढत होता 'मृत्यू'; रिपोर्ट पाहताच धक्का