TRENDING:

Viral News : मस्करीत घेतला MRI करण्याचा निर्णय, तरुणीसोबत पण नंतर जे घडलं ते धक्कादायक

Last Updated:
तिला कोणताही त्रास नव्हता, शरीर ठणठणीत होतं. पण केवळ उत्सुकता म्हणून तिने एमआरआय करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर सत्य ऐकून तिला धक्का बसला.
advertisement
1/10
मस्करीत घेतला MRI करण्याचा निर्णय, तरुणीसोबत पण नंतर जे घडलं ते धक्कादायक
माणसं मस्करीत बरंच काही करतात. पण कधीकधी त्यांना पश्चाताप होतो की आपण हे का केलं. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं. तिने मस्करीत असा एक प्रकार केला की नंतर तिला धक्का बसला. एका अर्थी तिने हे केलं त्यामुळे तिचा फायदाच झाला, पण अशी घटना समोर आली की त्याचा धक्का तिला बसला.
advertisement
2/10
सारा ब्लॅकबर्न असं या महिलेचं नाव आहे. ती एक उत्साही आणि आरोग्याबाबत जागरूक असलेली महिला आहे. खाणं-पिणं नीट, झोप पूर्ण, कुठलाही व्यसन नाही आणि कोणतीही तब्येतीची तक्रार नाही. तिच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरू होतं.
advertisement
3/10
पण साराने हे सहजच करायचं ठरवलं. तिला कोणताही त्रास नव्हता, शरीर ठणठणीत होतं. "माझ्या शरीरात काही गडबड आहे का, हे जरा स्वतःहूनच बघूया!" या विचाराने तिने हा स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. एकदा MRI करून बघूया!" असं तिला वाटलं.
advertisement
4/10
MRI म्हणजे 'मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग', जो मेंदू, हृदय, फुफ्फुसं किंवा शरीराच्या कोणत्याही भागाची सखोल तपासणी करतो. सहसा डॉक्टर जेव्हा एखाद्या गंभीर आजाराचा संशय येतो तेव्हाच हा स्कॅन करायला सांगतात.
advertisement
5/10
तिने वेळ ठरवली, हॉस्पिटलमध्ये जाऊन चाचणी केली. तब्बल एक तास वेगवेगळ्या स्कॅन्स झाल्या. यात तिच्या हृदय, मेंदू, यकृत, फुफ्फुसं आणि इतर अवयवांचे सखोल निरीक्षण करण्यात आले. स्कॅनिंग प्रक्रियेनंतर सारा घरी आली. तिला खात्री होती की रिपोर्ट नॉर्मलच येईल.
advertisement
6/10
चार दिवसांनी तिच्या हातात जेव्हा रिपोर्ट आला. तिने तो उघडला आणि तिथे जे लिहिलं होतं ते पाहून तिच्या अंगावर काटा उभा राहिला.
advertisement
7/10
तिच्या "स्प्लेनिक आर्टरी अॅन्युरिझम" splenic artery aneurysm (SAA) झाला, म्हणजेच तिच्या रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या सुजल्या होत्या. ही एक अत्यंत धोकादायक स्थिती होती! यामुळे कोणत्याही क्षणी रक्तस्राव होऊ शकत होता, आणि तो थांबवणं कठीण होतं. काही प्रकरणांमध्ये, हा आजार कोणतीही लक्षणं न देता थेट प्राणघातक ठरतो.
advertisement
8/10
हा रिपोर्ट कळताच डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी बोलावलं. सर्जरी करावी लागणार होती. "जर वेळेवर लक्ष दिलं नाही, तर ही स्थिती जीवघेणी ठरू शकते!" डॉक्टरांचे हे शब्द ऐकून साराच्या पायाखालची जमीनच सरकली. ती पूर्णपणे निरोगी होती, कधीही कुठलाही त्रास जाणवला नव्हता, पण या एका MRI मुळे तिला एक गंभीर सत्य समजलं.
advertisement
9/10
तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, यानंतरचे दोन महिने तिने भयंकर वेदना सहन केल्या. शरीर कमकुवत झालं होतं, रोज उठणंही कठीण वाटायचं. पण शेवटी ती यातून सावरली.
advertisement
10/10
साराने तिच्या अनुभवाची माहिती सोशल मीडियावर शेअर करत लोकांना एक मोठा संदेश दिला, "कधी कधी शरीर निरोगी वाटतं, पण आतमध्ये काही घडत असतं. वेळेवर आरोग्य तपासणी करणे किती महत्त्वाचं आहे, हे मला या घटनेने शिकवलं!"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Viral News : मस्करीत घेतला MRI करण्याचा निर्णय, तरुणीसोबत पण नंतर जे घडलं ते धक्कादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल