मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे सहा ते सात टप्पे झालेत. त्यांचे आंदोलन तिसऱ्या टप्प्यापर्यंत अतिशय सुरळीत होते. अगदी संभाजी भिडे, राज ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर इत्यादी नेत्यांचाही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता. मात्र जसजसं आंदोलन पुढे गेलं जरांगे पाटील आपल्या भूमिका बदलत गेले. ही गोष्ट मराठा समाजातील अनेकांना आवडली नाही. याचा कळस त्यावेळी झाला जेव्हा जरांगे पाटलांनी सांगितलं आपलं भांडण केंद्र सरकारशी नाही तर राज्य सरकारशी आहे. त्यामुळे विधानसभेच्या वेळेस आपण पाहुयात. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
जालन्यात महायुती फॅक्टर! अर्जुन भाऊ 100 टक्के निवडून येणार, कार्यकर्त्यांचा जल्लोष
संपूर्ण 288 जागा लढवण्याची त्यांनी तयारी केली. उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अगदी शेवटी मतदारसंघ देखील जाहीर केले. अचानक रात्रीतून त्यांनी जो यू टर्न घेतला त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं. ज्यांना मराठा आरक्षण आंदोलनातून निवडणूक लढवायची होती ते कार्यकर्ते नाराज झाले. हे नाराज झालेले कार्यकर्ते जरांगे पाटील यांच्या विरोधात गेली नाहीत मात्र हे कार्यकर्ते पुन्हा एकदा आपल्या आपल्या पक्षात सक्रिय झाले.
दुसरा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा किंवा कोणतीही राजकीय भूमिका घेतली नाही. याचा देखील सकारात्मक परिणाम मतदारांवर झाला. मनोज जरांगे यांचा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून गेलेल्या राजकीय संदेश यावेळी लोकांनी स्पष्टपणे नाकारला असा या निकालाचा अर्थ होतो, असं सुरेश केसापूरकर यांनी सांगितलं.
Maharashtra Election Results: 1990 नंतर राज्यात पहिल्यांदाच असं घडलं, जे भाजपलाही अपेक्षित नव्हतं