TRENDING:

Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कोणाचा आवाज घुमणार? अखेर बीएमसीने निर्णय घेतला

Last Updated:

मुंबई महापालिकेने या दसरा मेळाव्यासाठी कोणाला मैदान द्यायचे याबाबत निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय जाधव, मुंबई :  शिवसेनेच्या इतिहासात दसरा मेळाव्याला चांगलेच महत्त्व आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर ठाकरेसोबतच शिंदे गटही दसरा मेळावा घेऊ लागला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर कोणाचा दसरा मेळावा होणार, यावर दोन्ही गटांमध्ये चांगलीच जुंपली होती. मागील दोन वर्ष छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता. त्यानंतर यंदा कोणाला मैदान मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आता मुंबई महापालिकेने या दसरा मेळाव्याबाबत निर्णय घेतला आहे.
Shiv Sena Dasara Melava
Shiv Sena Dasara Melava
advertisement

मागील दोन वर्षांपासून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट मैदानाच्या परवानगीवरून आमनेसामने आले होते. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वातील शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानासाठी चांगलीच कंबर कसली होती. तर ठाकरे गटानेही जोर लावला होता. मागील वर्षीदेखील ठाकरे आणि शिंदे गटात मैदानाच्या परवानगीवरून चांगलीच चुरस लागली होती. मात्र, शिंदे गटाने आपला दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर घेतला.

advertisement

शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा आवाज?

दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मिळावे यासाठी ठाकरे गटाने चांगलीच तयारी केली होती. काही महिने आधीच ठाकरे गटाने मैदानाची मागणी करणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले होते. मात्र, महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नव्हता. मैदानाच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेला स्मरण पत्र पाठवले होते. अखेर आज ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मुंबई महानगर पालिकेने शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे यंदा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे.

advertisement

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा अनोखा विक्रम...

शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळाव्याला मोठं महत्त्व आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दसरा मेळाव्यातून आपल्या पक्षाच्या राजकारणाची संभाव्य दिशा स्पष्ट करत असे. या दसरा मेळाव्यात त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्ले चढवले. चार दशकांचा काळ, एक नेता आणि एकाच मैदानावर पार पडत असलेली सभा म्हणून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा विक्रम आहे.

advertisement

मराठी बातम्या/Politics/
Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कोणाचा आवाज घुमणार? अखेर बीएमसीने निर्णय घेतला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल