TRENDING:

खराडीतील 'त्या' 12 लाखांच्या ड्रग्जने उलगडलं 4 कोटींचं घबाड, पुणे पोलिसांचे जोधपूरमध्ये धाडसी ऑपरेशन

Last Updated:

आंतरराज्यीय पातळीवर कार्यरत असलेल्या या अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठे यश मिळवत राजस्थानमधील जोधपूर येथे छापेमारी करून सुमारे 4 कोटी रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रोन) हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आंतरराज्यीय पातळीवर कार्यरत असलेल्या या अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून 12 लाख रुपये किमतीचे 27 ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजस्थानमधील जोधपूरपर्यंत पोहोचत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पुणे पोलिसांनी विशेष पथक तयार करून जोधपूर येथे छापेमारी केली.

advertisement

रॅकेटचा मुख्य सूत्रधार रामकरण जाट याला अटक

या कारवाईत या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार रामकरण जाट याला अटक करण्यात आली. रामकरण जाट हा मोठ्या प्रमाणावर एमडी तयार करून विविध राज्यांमध्ये त्याचा पुरवठा करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्याकडून आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून एकूण 1 किलो 960 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, याची अंदाजे बाजार किंमत सुमारे 4 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

advertisement

पुण्यातही विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी

दरम्यान, पुण्यातही विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत या रॅकेटशी संबंधित अन्य पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अंमली पदार्थ विक्रीसाठी वापरण्यात येणारी वाहने, मोबाईल फोन, डिजिटल उपकरणे आणि काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

advertisement

अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे बळ

हे अंमली पदार्थ किती जणांना विकले गेले, त्यांची वितरण साखळी किती मोठी आहे, तसेच यामागे आणखी कोणते मोठे मास्टरमाइंड आहेत का, याचा सखोल तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. आंतरराज्यीय पातळीवर पसरलेल्या या रॅकेटचा संपूर्ण छडा लावण्यासाठी विविध राज्यांच्या पोलिसांशी समन्वय साधण्यात येत आहे. या यशस्वी कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे बळ मिळाले असून, शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना कडक संदेश मिळाल्याचे बोलले जात आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

मोठी बातमी! शहीद जगदाळेंच्या लेकीच्या नोकरीसाठी थेट मुख्यमंत्री मैदानात, तरीही कुटुंबाचे समाधान होईना, कारण काय?

मराठी बातम्या/पुणे/
खराडीतील 'त्या' 12 लाखांच्या ड्रग्जने उलगडलं 4 कोटींचं घबाड, पुणे पोलिसांचे जोधपूरमध्ये धाडसी ऑपरेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल