मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील आदिवासी मुलांच्या शासकीय रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे. आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहात पाणी प्यायल्यामुळे २० मुलांना अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे मुलांना तातडीने नवीन भोसरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. १० मुलांवर अजूनही उपचार सुरू आहे.
आदिवासी वसतीगृहात हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी असा हलगर्जीपणा करणे अत्यंत निंदनीय आणि गंभीर बाब आहे. या बद्दल प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित गृहपाल राजकुमार राक यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांची या वस्तीगृहातून कायमची हकालपट्टी करावी, अशी मागणी आदिवासी संघटनेनं केली आहे. तसंच, संबंधितांवर तात्काळ कारवाई झाली नाही, तर वस्तीगृहात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी संघटनेनं दिला.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
