घटनेत इतर 2 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर येत आहे. डिंगोरे येथे मध्यप्रदेशमधून दोन-तीन दिवसांपूर्वीच काही शेतमजूर कामासाठी आले होते. त्यातील हे मजूर होते.
नवी मुंबईत भीषण अपघात; कारची पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक
रविवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास कल्याणवरून ओतूरच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव कारने (एम.एच.12 व्ही.क्यु.8909) महामार्गावरील पायी चालत असलेल्या पाच परप्रांतीय मजुरांना जोरदार धडक दिली. या अपघातात जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले या तिघांनी आपला जीव गमावला आहे. तर दिनेश जाधव आणि विक्रम तारोले हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
advertisement
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन कांडगे यांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना मदत केली. गेल्या चार-पाच दिवसात कल्याण महामार्गावर वारंवार अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. गावालगत गतिरोधक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
