TRENDING:

पत्नी अंघोळीसाठी खोलीबाहेर पडली अन् पतीनं असं काही केलं की इंदापूर हादरले, अंगावर शहारे आणणारी घटना

Last Updated:

प्राथमिक तपासात हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मधुकर गलांडे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : इंदापूर तालुक्यातील शेळगाव (ता. इंदापूर) येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली आहे. मनीषा मल्हारी खोमणे (वय 35) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, पती मल्हारी उर्फ बापू खोमणे याने तिच्या डोक्यात जबर प्रहार करून तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे शेळगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान मनीषा खोमणे ही अंघोळीसाठी घरातून बाहेर जात असताना संशयित आरोपी पती मल्हारी उर्फ बापू खोमणे याने पाठीमागून येत तिच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात मनीषा जागीच कोसळली आणि गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तातडीने तिला इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

advertisement

खून कौटुंबिक वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज  

घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

घटनेनंतर आरोपी फरार

advertisement

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी मल्हारी उर्फ बापू खोमणे याच्यावर यापूर्वीही वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्यास ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर 

या घटनेमुळे शेळगाव गावात हळहळ व्यक्त केली जात असून मनीषा खोमणे यांच्या पश्चात कुटुंबीयांचा मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. वालचंदनगर पोलीस पुढील तपास करत असून लवकरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

advertisement

हे ही वाचा : 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
62 वर्षांच्या तरुणाचा आकुर्डी ते तिरुपती1136 किमी सायकल प्रवास, दिला खास संदेश
सर्व पहा

BF साठी नवरा सोडला, 4 दिवसांत उतरलं प्रेमाचं भूत, पुण्यातील विवाहितेसोबत धक्कादायक घडलं

मराठी बातम्या/पुणे/
पत्नी अंघोळीसाठी खोलीबाहेर पडली अन् पतीनं असं काही केलं की इंदापूर हादरले, अंगावर शहारे आणणारी घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल