BF साठी नवरा सोडला, 4 दिवसांत उतरलं प्रेमाचं भूत, पुण्यातील विवाहितेसोबत धक्कादायक घडलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यातील काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधांसाठी घरदार सोडून आलेल्या एका विवाहितेवर तिच्याच प्रियकराने जीवघेणा हल्ला केला आहे.
पुणे: पुण्यातील काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधांसाठी घरदार सोडून आलेल्या एका विवाहितेवर तिच्याच प्रियकराने जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपी प्रियकराने तिला बेल्ट आणि लोखंडी कुलपाने मारहाण केली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रियकराला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ३० वर्षीय विवाहित महिला आणि आरोपी संदेश चोपडे (रा. अमरदीप कॉलनी, काळेवाडी) यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. प्रेमाखातर या महिलेने चार दिवसांपूर्वीच आपले घर सोडले आणि ती काळेवाडी येथील ज्योतिबानगर भागात संदेशसोबत राहण्यासाठी आली. मात्र, काही दिवसातच संदेशचं खरं रूप समोर आलं.
सासूचं घर विकण्यासाठी लावला तगादा
advertisement
संदेश हा अविवाहित असून त्याला पैशांची लालसा होती. यासाठी त्याने पीडित महिलेकडे एक भलतीच मागणी लावून धरली. "तुझ्या सासूच्या नावावर असलेलं घर विक आणि त्यातून मिळणारे पैसे मला आणून दे," असा तगादा त्याने लावला होता. ही मागणी अत्यंत अवाजवी असल्याने विवाहितेने त्याला स्पष्टपणे नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये खटके उडू लागले.
advertisement
पट्टा आणि लोखंडी कुलूपाने जीवघेणा हल्ला
गुरुवारी (१८ डिसेंबर) रात्री १० वाजेच्या सुमारास या विषयावरून पुन्हा वाद झाला. संतापलेल्या संदेशने रागाच्या भरात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने कमरेचा पट्टा काढून तिला बेदम मारले. एवढ्यावरच न थांबता, जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने घरातील मोठे लोखंडी कुलूप हातात घेतले आणि महिलेच्या डोक्यात ठिकठिकाणी वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.
advertisement
आरोपीला अटक, पोलिसांकडून तपास सुरू
या धक्कादायक प्रकारानंतर जखमी महिलेने हिंमत करून काळेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी संदेश चोपडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला तातडीने अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
BF साठी नवरा सोडला, 4 दिवसांत उतरलं प्रेमाचं भूत, पुण्यातील विवाहितेसोबत धक्कादायक घडलं










