कुत्र्याच्या चाव्यामध्ये मृत्यू झालेल्या पाच वर्षीय चिमुरड्याचं नाव राहिल रियाज शेख असं होतं. तो भिवंडीतील पडघ्यामध्ये आपल्या घराबाहेर खेळत होता. खेळत असताना त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये त्या भटक्या कुत्र्याने रियाजचा चावा घेतला. कुत्रा चावल्यानंतर रियाजचे कुटुंबीय रियाजला भिवंडीतील पडघ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन गेले. तिथे रेबीजची लस देऊन त्याला पुढील उपचारासाठी भिवंडीतल्या आय जी एम रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांनी मुलाची परत प्रकृती बिघडल्याने त्याला पालक पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. तेथून रियाजला भिवंडी आणि पुढे ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
advertisement
जिल्हा रुग्णालयातही रियाजची अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्याला मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच राहिलचा मृत्यू झाला. राहिलच्या मृत्यूनंतर भिवंडीसह आसपासच्या परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबियांनी पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य ते उपचार वेळेत न केल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार पाहायला मिळत आहे. या पूर्वी देखील अनेकांचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून भिवंडी आणि ठाणे जिल्हा रूग्णालयावर काही कारवाई केली जातेय का? हे पाहण महत्त्लाचं ठरणार आहे.
