पुणे : पुणे शहरात अनेक जुने खाद्य पदार्थगृहे आहेत आणि पुणे शहराची ओळख जपणारी उपहार गृहेही आपण पाहिली असतील. त्याचप्रमाणे पुण्यातील कुमठेकर रोड सदाशिव पेठ या ठिकाणी असलेले चंद्रविलास उपहार गृह आहे. जवळपास 68 वर्ष जुन्या या उपहारगृहात तिखट मिसळ मिळते. अनेक लोकांची ही मिसळ आवडती बनली आहे. ही मिसळ नेमकी कशी बनवली जाते, याचविषयी आपण जाणून घेऊयात.
advertisement
इथे तुम्हाला मिसळ पाव हे 90 रुपयांना मिळतात तर वडा सॅम्पल, पालक भजीदेखील मिळतात. वडा सॅम्पल हा येथील प्रसिद्ध पदार्थ आहे. वर्षानुवर्षे अनेक लोक इथे फक्त मिसळ खाण्यासाठी येतात. तेव्हापासून ते आजपर्यंत तीच चव चाखायला मिळते. त्याचप्रमाणे शंकरपाळेही खायला मिळते.
1956 साली आमच्या आजोबांनी या व्यवसायाला सुरुवात केली होती. आता ही तिसरी पिढी आहे, जी पुढे हा व्यवसाय चालवत आहे. मिसळसाठी लागणारे शेव, नायलॉन पोहे हे सगळं आम्ही स्वतः बनवतो. तसेच चांगल्या तेलामध्ये हे सगळं तयार करतो, त्यामुळे याला एक वेगळी चव आहे, असे येथील व्यावसायिक समीर झोरे सांगितले.
तसेच इथे तयार होणारे सगळे पदार्थ हे शुद्ध तेलात बनवले जातात. तर मसाले हे ते स्वतः तयार करतात आणि हेच मसाले या मिसळसाठी वापरले जातात. त्यामुळे आजही तिच चव टिकून आहे. अगदी कमी किमतीमध्ये ही मिसळ तुम्हाला मिळते. सकाळी 7. 30 ते रात्री 7 पर्यंत हे सुरू असते, अशी माहिती व्यावसायिक समीर झोरे यांनी दिली.