अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील चाकण नगरीत पार पाडला. या मेळाव्याला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थित होती. तसेच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती होती. याच मेळाव्यात अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांचे विधानसभेतील कामाचे कौतुक करून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
advertisement
Ayushman Bharat : मोदी सरकारकडून आजी-आजोबांना 'आयुष्मान' गिफ्ट; वयाच्या सत्तरीनंतर मोफत उपचार
दिलीप मोहिते पाटलांची अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर
अजित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत जागा वाटपाच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. अजून कोणती जागा कुणाला जाणार, याचे सूत्र ठरलेले नाही. विद्यमान कार्यक्रमाट आमदारांना पुन्हा संधी द्यावी, याकडे कल आहे. त्यानुसार विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा संधी द्यावी, अशी जनतेची इच्छा असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच मी आज उमेदवार जाहीर करणार नाही, नाहीतर आमच्या महायुतीतील लोक म्हणायचे, हा बाबा तर जागाच जाहीर करायला लागलाय, अशी फटकेबाजीही त्यांनी केली.
मोहिते पाटलांना लाल दिवा देणार, दादांची जाहीर सभेत घोषणा
दिलीप मोहिते पाटील यांना मी विधानसभेला पुनश्च संधी दिल्यावर त्यांना बहुमतांनी निवडून द्या. त्यांना मतरूपी आशीर्वाद द्या. आमदारकीच्या पुढे त्यांची गाडी गेलेली नाही. त्यांची गाडी लाल दिव्यापर्यंत पोहोचावी, अशी येथील जनतेची इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन, अशी थेट घोषणाच अजित पवार यांनी केली.
चाकणरांनो मला तुमच्या बहुमोल साथीची गरज
राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार समर्थक आमदारांच्या जिल्ह्यात जाऊन राष्ट्रवादीला आशीर्वाद देण्याचे आवाहन करत आहेत. आजही त्यांनी घड्याळावर लक्ष ठेवा, अशी विनंती केली. ते म्हणाले, "चाकणकरांनो आणि खेडकरांनो मला साथ द्या. तुमच्या बहुमोल साथीची मला गरज आहे. अर्थमंत्री म्हणून मी तुमच्या तालुक्याला निधी देऊ शकलो, याचा मनापासून आनंद आहे. मोहिते पाटलांच्या रुपाने तालुक्याला ४५०० हजार कोटींचा निधी देऊन तालुक्याचा चेहरामोहरा पालटण्याचे काम झाले आहे".