Ayushman Bharat : मोदी सरकारकडून आजी-आजोबांना 'आयुष्मान' गिफ्ट; वयाच्या सत्तरीनंतर मोफत उपचार
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2024 मध्ये 70 पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी आयुष्मान भारत आरोग्य योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली होती. त्यातच आता केंद्रीय मंत्री मंडळाने याबाबत निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्री मंडळाने बुधवारी (11 सप्टेंबर 2024) आयुष्मान भारत - पंतप्रधान जनआरोग्य योजना आता 70 पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजेच सर्व उत्पन्न गटांतील ज्येष्ठांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आता या योजनेअंतर्गत 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2024 मध्ये 70 पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी आयुष्मान भारत आरोग्य योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली होती. त्यातच आता केंद्रीय मंत्री मंडळाने याबाबत निर्णय घेतला आहे. सुमारे 4.5 कोटी कुटुंबांना प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा संरक्षण प्रदान करण्याचे या योजनेचं उद्दिष्ट असेल. ज्यामुळे सुमारे 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल.
advertisement
ज्येष्ठ नागरिकांना नवीन स्वतंत्र कार्ड
सर्वच उत्पन्न गटांतील ज्येष्ठांना मिळणार लाभ
‘70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांची आर्थिक स्थिती विचारात न घेता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांना नवीन स्वतंत्र कार्ड देण्यात येणार आहे. आधीच आयुष्मानच्या कक्षेत असलेल्या कुटुंबांना 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त आरोग्य संरक्षण मिळेल,’ असंही केंद्र सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केलंय.
advertisement
5 लाख रुपये आरोग्य विमा संरक्षण
आरोग्य योजना निवडण्याचा मिळेल पर्याय
आयुष्मान भारत योजनेंतर्गत आता 70 किंवा त्यापेक्षा ज्यात वयाच्या ज्येष्ठांना प्रति वर्ष 5 लाख रुपये आरोग्य विमा संरक्षण देण्यात येणार आहे. मात्र, जे ज्येष्ठ नागरिक पहिल्यापासून केंद्र सरकारची आरोग्य योजना म्हणजेच सीजीएचएस, माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना म्हणजेच ईसीएचएस, आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजेच सीएपीएफ सारख्या अन्य सार्वजनिक विमा योजनांचा फायदा घेत आहेत, ते त्यांची विद्यमान योजना किंवा आयुष्मान भारत योजना निवडू शकतात.
advertisement
याशिवाय 70 वर्षांपेक्षा जास्त वयांपेक्षा जास्त वय असलेले जे ज्येष्ठ नागरिक खासगी विमा पॉलिसी तसंच कर्मचारी राज्य विमा योजनेच्या अंतर्गत आहेत, ते देखील आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतील, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे ज्येष्ठांना दिलासा मिळणार आहे.
Location :
Delhi
First Published :
September 12, 2024 11:38 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Ayushman Bharat : मोदी सरकारकडून आजी-आजोबांना 'आयुष्मान' गिफ्ट; वयाच्या सत्तरीनंतर मोफत उपचार