पुणे : गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आंदेकर कुटुंबाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबात अनेक तर्क- वितर्क लढवले जात होते. अखेर आज एबी फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरांच्या घरात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून देण्यात आला AB फॉर्म देण्यात आले आहे.
advertisement
नातवाच्या खुनाचा आरोप असलेल्या बंडू आंदेकर याने काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडे अर्ज केला होता. अजित पवार गटाकडून निवडणूक लढवायची आहे, त्यासाठी अर्ज भरण्याची मुभा मिळावी, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. "निवडणूक लढवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यापासून कोणालाही रोखता येणार नाही," असे स्पष्ट करत न्यायालयाने आंदेकरला निवडणूक लढण्यास परवानगी दिली होती.
आंदेकर यांच्या वकिलांच्या मार्फत AB फॉर्म भरण्यात आले
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून बंडू आंदेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विशेष म्हणजे, सध्या अटकेत असलेल्या आंदेकरला न्यायालयाने काही अटी आणि शर्तींसह अर्ज भरण्याची परवानगी दिली होती. विशेष न्यायालयाच्या परवानगीनंतर आंदेकर कुटुंबातील तिघं सदस्य भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिले. लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांनी अर्ज दाखल केले होते. अखेर आज शेवटच्या दिवशी आंदेकर यांच्या वकिलांच्या मार्फत भरण्यात AB फॉर्म भरण्यात आले. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
आंदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे अजित पवार गटाने या उमेदवारीबाबत अत्यंत गुप्तता पाळली होती. अधिकृत घोषणा न करता थेट अर्ज भरण्यावर भर देण्यात आला, जेणेकरून विरोधाची धार कमी करता येईल. मात्र, सत्ताधारी पक्षाने अशा प्रकारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पाठबळ दिल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आंदेकर कुटुंबीयांना उमेदवारी देऊ नये, कोमकरच्या आईचा इशारा
बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीने अनेकांची घरे उद्धवस्त केली आहेत. आंदेकर कुटुंबीयांना अजित पवार यांनी उमेदवारी देऊ नये, अन्यथा मी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करेल, असा इशारा बंडू आंदेकर मुलगी आणि आयुष कोमकरच्या आईने दिली होती.
हे ही वाचा :
