Pune Election : बंडू आंदेकरचा शातीर गेम सुरू, वनराजच्या पत्नीनेही साधली संधी अन् एक चूक केली, सोमवारी पुन्हा जेलमधून बाहेर येणार?

Last Updated:

Pune Bandu Andekar Application Reject : लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांनी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. मात्र, पण त्यांचे अर्ज अर्धवट भरलेले असल्याने ते स्वीकारण्यात आले आले नाहीत.

Pune Crime Gangster Bandu Andekar Application Reject as
Pune Crime Gangster Bandu Andekar Application Reject as
Sonali Andekar Application Reject : आपल्या नातवाचा खून करून पुण्यातील गँगवॉर भडकवणाऱ्या बंडू आंदेकरने आता नवा खेळ सुरू केला आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकर याने पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी न्यायलयाकडून परावानगी घेतली होती. न्यायलयाच्या परवानगीनंतर शनिवारी बंडू क्षेत्रिय कार्यालयात आला अन् मोक्कार घोषणाबाजी केली. मात्र, बंडूने आपला गेम प्लॅन सुरू केला आहे.

आंदेकरांनी अर्धवट भरले अर्ज

विशेष न्यायालयाच्या परवानगीनंतर आंदेकर कुटुंबातील तिघं सदस्य भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले होते. यामध्ये लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांनी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. मात्र, पण त्यांचे अर्ज अर्धवट भरलेले असल्याने ते स्वीकारण्यात आले आले नाहीत. ते तिघे आता उद्या पुन्हा अर्ज भरण्याची शक्यता आहे.
advertisement

जेलमधून बाहेर येण्याचा मास्टरप्लॅन

बंडू आंदेकरसह तिघांचेही अर्ज बाद करण्यात आल्याने आता वनराजच्या पत्नीने देखील बंडूच्या पावलावर पाऊल टाकून जेलमधून बाहेर येण्याचा मास्टरप्लॅन तयार केला आहे. आंदेकर कुटुंबातील बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर हे प्रभाग क्रमांक २२, २३ व २४ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
advertisement

...म्हणून अर्ज स्वीकारले नाहीत

दरम्यान ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’, ‘आंदेकरांना मत, विकासाला मत’ अशी घोषणाबाजी आंदेकरने केली. या तिघांना अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. त्यानुसार काल दुपारी पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल केला. बंडू आंदेकरने प्रभाग क्रमांक २४ कसबा पेठ-कमला नेहरू रुग्णालय-केएमई येथून तर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरने प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ-नाना पेठ येथून अर्ज भरल्याची चर्चा होती. पण या तिघांचेही अर्ज अर्धवट असल्याने त्यांचे अर्ज स्वीकारले नाहीत.  भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सागितले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Election : बंडू आंदेकरचा शातीर गेम सुरू, वनराजच्या पत्नीनेही साधली संधी अन् एक चूक केली, सोमवारी पुन्हा जेलमधून बाहेर येणार?
Next Article
advertisement
ZP Election Maharashtra: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी अपडेट...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी
  • नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

  • दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचे वृत्त समोर

  • महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार अ

View All
advertisement