हिंजवडीतील आयटी इंजिनिअरसोबत विचित्र घडलं; घरातील 23 लाखाचं सामान गायब, तुम्हीही करताय 'ही' चूक?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपींनी आधी सामान नेण्यासाठी फिर्यादीकडून १ लाख २८ हजार रुपये अॅडव्हान्स घेतले. मात्र, पैसे घेऊनही सामान गावी पोहोचवले नाहीच.
पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरातून एका आयटी इंजिनिअरची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. घरगुती सामान झारखंडला पोहोचवण्याच्या बहाण्याने सुमारे २३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'EIE मार्केट प्लेस टेक्नॉलॉजी' या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी सामान लंपास करून विश्वासघात केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मूळचे झारखंडचे असलेले अभिषेककुमार सीताराम पाठक (वय ३०, रा. हिंजवडी) यांना आपले घरगुती साहित्य गावी पाठवायचे होते. यासाठी त्यांनी 'EIE MARKET PLACE TECHNOLOGIES' या ट्रान्सपोर्ट कंपनीची मदत घेतली. कंपनीचे ऑपरेशन हेड मोहनकुमार आणि एम.डी. सोना त्रिवेदी यांनी सामान सुरक्षितरित्या झारखंडला पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते.
१५ आणि १६ नोव्हेंबर दरम्यान ही घटना घडली. आरोपींनी आधी सामान नेण्यासाठी फिर्यादीकडून १ लाख २८ हजार रुपये अॅडव्हान्स घेतले. मात्र, पैसे घेऊनही सामान गावी पोहोचवले नाहीच. उलट फिर्यादीचे एकूण २३ लाख ८० हजार रुपये किमतीचे मौल्यवान घरगुती साहित्य परस्पर लंपास करून त्याचा अपहार केला.
advertisement
सामान मिळत नसल्याचे आणि कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच पाठक यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या तक्रारीवरून मोहनकुमार आणि सोना त्रिवेदी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६(३), ३१६(५) आणि ३(५) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 10:54 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
हिंजवडीतील आयटी इंजिनिअरसोबत विचित्र घडलं; घरातील 23 लाखाचं सामान गायब, तुम्हीही करताय 'ही' चूक?











