गर्भवती लेकीच्या पोटात रॉड, डोक्यात कुऱ्हाडीचे वार! ऑनर किलिंगच्या घटनेने पोलीसही हादरले, सैतान बापाने स्वत:च्या मुलीला संपवलं

Last Updated:

Karnataka Pregnant Wife Murder : मान्या पाटील असं या दुर्दैवी घटनेतील मृत महिलेचे नाव असून, ती गरोदर होती. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या वडिलांनीच लोहेच्या रॉडने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.

Karnataka Pregnant Wife Murder case honour killing
Karnataka Pregnant Wife Murder case honour killing
Honour killing Hubli Case : प्रेमविवाहातून ऑनर किंलिंगच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. अशातच आता हुब्बल्ली परिसरातून मन सुन्न करणारी एक घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे बाप-लेकीच्या नात्यांमधील ओलावा संपला असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं. कर्नाटकातील इनाम वीरापुरा गावात घडलेल्या या भीषण कृत्यानंतर स्थानिक प्रशासनाने कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.

गरोदर मान्याचा जागीच मृत्यू 

मान्या पाटील असं या दुर्दैवी घटनेतील मृत महिलेचे नाव असून, ती गरोदर होती. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या वडिलांनीच लोहेच्या रॉडने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मान्या यांचा जागीच मृत्यू झाला. केवळ दुसऱ्या जातीत लग्न केल्याचा राग मनात धरून स्वतःच्या मुलीचा जीव घेण्याचे हे क्रूर कृत्य 'ऑनर किलिंग'चा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. पत्नी मान्याची घरातच हत्या करण्यात आली. 20 वर्षांची मान्या गर्भवती होती. हत्येचा आरोप मान्याच्या कुटुंबावर आहे.
advertisement

आवाज ऐकून वडील धावत आले पण...

विवेकानंद यांच्या म्हणण्यानुसार, '22 डिसेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता मान्याचे वडील प्रकाशगोड्डा पाटील त्यांचे दोन नातेवाईक इरन्ना, वीरप्पा आणि अरुण यांच्यासोबत आमच्या घरात घुसले. त्यावेळी घरात मान्या आणि आई उपस्थित होत्या. हल्लेखोरांच्या हातात कुऱ्हाड आणि स्प्रिंकलर पाईप होते. हे पाहून आईने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून वडील धावत आले. ते मान्याला वाचवण्यासाठी धावले, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांना पकडून रॉडने मारले.'
advertisement

सासरच्या मंडळींचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, मान्या आणि त्यांच्या पतीने काही दिवसांपूर्वीच पळून जाऊन विवाह केला होता. त्यानंतर कुटुंबाकडून धमक्या येत असल्याने त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणीही केली होती. प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर हे दाम्पत्य पुन्हा गावात राहायला आले होते. मात्र, रविवारी संध्याकाळी मान्या यांच्या वडिलांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी सासरच्या मंडळींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही गंभीर दुखापत झाली.
advertisement

वडिलांसह 3 आरोपींना अटक

हुब्बल्ली ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत मान्या यांच्या वडिलांसह 3 आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात संताप व्यक्त केला जात असून, आंतरजातीय विवाहाच्या विरोधातून एका गरोदर महिलेचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
गर्भवती लेकीच्या पोटात रॉड, डोक्यात कुऱ्हाडीचे वार! ऑनर किलिंगच्या घटनेने पोलीसही हादरले, सैतान बापाने स्वत:च्या मुलीला संपवलं
Next Article
advertisement
ZP Election Maharashtra: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी अपडेट...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी
  • नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

  • दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचे वृत्त समोर

  • महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार अ

View All
advertisement