TRENDING:

Ajit Pawar Death : राजकारणात दादा माणूस गेला! बारामतीकर ढसाढसा रडले, मिटकरींना अश्रू अनावर, हॅास्पिटलमधला पहिला Video

Last Updated:

Ajit Pawar Death In Plane Accident : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूने राज्याला धक्का बसला आहे. बारामती विमानतळाजवळील एका शेतामध्ये विमान कोसळलं आहे. हा अपघाता 9 ते 9.15 दरम्यान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ajit Pawar Death In Plane Crash: आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाल्याची माहिती मिळाली आहे.
Ajit Pawar Plane Accident Death First Video From Hospital
Ajit Pawar Plane Accident Death First Video From Hospital
advertisement

समर्थकांना अश्रू अनावर

बारामतीतील रुग्णालयात मोठा जणसमुह पहायला मिळाला. अजित पवार यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले. तर अनेक मोठे नेते रुग्णालयात दाखल होत आहे. सुप्रिया सुळे देखील दिल्लीवरून रवाना झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आमदार अमोल मिटकरी यांना अश्रू अनावर झाले. रडता रडता ते गाडीतून बारामतीला रवाना झाले आहेत.

advertisement

पाहा Video

शेतामध्ये विमान कोसळलं

दरम्यान, बारामती विमानतळाजवळील एका शेतामध्ये विमान कोसळलं आहे. हा अपघाता 9 ते 9.15 दरम्यान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. अपघातग्रास्त विमान आगीतपूर्णपणे खाक झाले. विमान अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा वाढले, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

हेही वाचा: अजित पवार योजना क्रॅश लाईव्ह अपडेट

मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Death : राजकारणात दादा माणूस गेला! बारामतीकर ढसाढसा रडले, मिटकरींना अश्रू अनावर, हॅास्पिटलमधला पहिला Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल