कधीकाळी आपला बालेकिल्ला असलेला पिंपरी चिंचवडचा गड पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे. त्यासाठीच दादा पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद वाढवत आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. मात्र , दादांचा हा सगळाच खटाटोप आगामी महापालिका जिंकण्यासाठी आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अजित पवार आपल्या बालेकिल्ल्यात असल्यामुळे आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना काय कानमंत्र देतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.
advertisement
भाजपच्या गोटात खळबळ
अजित पवारांनी तर मग त्याची थेट लढाई भाजपशी असेल आणि म्हणून आज त्यांनी आपला जनसंवाद उपक्रम भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदार संघात घेत आमदार शंकर जगताप यांना आव्हान दिले आहे, असे जाणकारांना वाटते. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आह. मात्र या शक्यतेवर तिरकस प्रतिक्रिया देत भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी दादांच्या खटाटोपामुळे त्यांच्या पक्षाला बळ मिळेल का माहीत नाही पण महापालिकेवर मात्र आमचीच सत्ता येईल असं म्हटले आहे.
शंकर जगताप काय म्हणाले?
शंकर जगताप म्हणाले, गेल्या वर्षभरात आम्ही १४ उपक्रम राबवले आहेत. पिंपरी- चिंचवडकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आग्रही आहेत.दादा हे राज्याचे नेते तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते पुण्यातील सगळ्याच भागात भेटी देत आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिकेवर आमचीच सत्ता येईल.