TRENDING:

Pune News: मुसळधार पावसानं पुणे विद्यापिठातील उत्तर पत्रिका भिजल्या, विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी, धक्कादायक प्रकार

Last Updated:

पुण्यामध्ये काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका भिजल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुण्यात काल (30 मार्च- सोमवार) सायंकाळी अवकाळी पावसाने लावलेल्या दमदार हजेरीने सर्वांचीच दमछाक झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या गाऱ्यांच्या पावसाने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या अवकाळी पावसामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका भिजल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे का? असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
News18
News18
advertisement

तर दुसरीकडे, या उत्तर पत्रिका निकाली काढण्यासाठी संकलित करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार अधिकार मंडळामार्फत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उत्तर पत्रिका मूल्यमापन आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाली काढण्याची प्रक्रिया केली जाते. सध्या त्या उत्तरपत्रिका निकाली काढण्याची कार्यवाही सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहेत.

advertisement

या अंतर्गत उत्तर पत्रिका ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व उत्तरपत्रिका सध्याच्या नसून गेल्या दहा वर्षातल्या असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दहा वर्षातल्या निरस्त करण्यासाठी काढलेल्या जुन्या उत्तरपत्रिकांचे हे गठ्ठे आहेत. त्या निरस्त करायचं कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे. कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कंत्राटाच काम येत्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. परंतु आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्व जुन्या पेपरवर पाणी फिरलं आहे. अवकाळी पावसामुळे फक्त सामान्य नागरिकांचीच नाही तर, सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात कैरीचं लोणचं खाऊन कंटाळा येतोय? बनवा खास तक्कू, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

दरम्यान, काल सायंकाळी पुण्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे खोलगट भागांमध्ये पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यामधून पुणेकरांनी रस्ता काढला. फक्त वाहनचालकांचीच नाही तर, रस्त्याने चालणाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान, काल सायंकाळी शहरातील अनेक रस्त्यांवर गारांचा खच पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. दरम्यान, राज्यामध्ये पावसाचे वातावरण पुढचे काही दिवस अशीच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आता घराबाहेर पडताना छत्री सुद्धा घेऊन निघावं लागणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: मुसळधार पावसानं पुणे विद्यापिठातील उत्तर पत्रिका भिजल्या, विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी, धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल