TRENDING:

पुणे हादरलं! मैत्रिणीकडे बघून गाणं गायल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, चाकूने केले सपासप वार

Last Updated:

Pune News: पुण्यातील उत्तमनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका २६ वर्षीय तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुण्यातील उत्तमनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका २६ वर्षीय तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मैत्रिणीकडं पाहून गाण गायल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. किरकोळ कारणातून अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण प्रिन्स शैलेंद्र सिंग (वय २६, रा. भैरवनाथनगर, कोंढवे धावडे) हा ५ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास उत्तमनगरमधील कोंढवा गेट परिसरात थांबला होता. त्याच वेळी मुख्य आरोपी करण वाशिलकर हा देखील तिथे उपस्थित होता. प्रिन्सने आपल्या मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले, असा वाशिलकर याचा गैरसमज झाला. याच कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली.

advertisement

पाच जणांनी मिळून केला हल्ला

हा वाद इतका विकोपाला गेला की, वाशिलकरने त्याच्या इतर चार साथीदारांना बोलावून घेतले. आरोपींनी सुरुवातीला प्रिन्सला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि त्यानंतर काही समजण्यापूर्वीच त्यांच्याकडील तीक्ष्ण शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात प्रिन्स गंभीर जखमी झाला असून, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रिन्सला सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रिक्षा ड्रायव्हरच्या लेकीनं ठरवलं अन् गाव बदललं, खाकी वर्दीनं दिली मुलींना दिशा
सर्व पहा

या जीवघेण्या हल्ल्यानंतर जखमी प्रिन्स सिंग याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या. करण गणपत वाशिलकर (वय ३४), रोहित उर्फ ओजी गणेश मौर्य (वय २४), गणेश सिद्धराम कालदीप (वय २०), आदित्य गणेश पवार आणि बबलू शिवाजी कांबळे (वय २२) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी उत्तमनगर परिसरातीलच रहिवासी आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या या खुनाच्या प्रयत्नामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! मैत्रिणीकडे बघून गाणं गायल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, चाकूने केले सपासप वार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल