बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान
सरकारी नोकरी मिळविण्यासाठी ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकरी घेतली आहे, यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखली शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत कोणाला माहिती असल्यास ती 9158278484 या नंबर वर व्हॉट्स करावी. माहिती देणाऱ्यांची नाव गोपनीय ठेवले जाईल, असं आवाहन आता बच्चू कडू यांनी केलं आहे.
advertisement
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी लाटल्याची माहिती मला समजली आहे. यावर मी आधी पण बोललो आहे. यामध्ये एक समिती गठीत करत आहे. ज्यांनी फसवणूक करून दाखले घेतले आहेत, अशा लोकांवर सुधारित नवीन कलमानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल होतील. पूजा खेडकर दिव्यांग नसताना तिने याचा लाभ घेतला. अशा झारीतल्या शुक्राचार्यांना शोधून काढू, असेही बच्चू कडू म्हणाले होते.
वाचा - पूजा खेडकर यांच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयाचा दिलासा; काय घडलं कोर्टात?
पूजा खेडकर यांना जन्मठेप व्हावी : बच्चू कडू
मंगळवारी बच्चू कडू यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. यावेळी पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे. हायकोर्टाचे निकाल बदलायला लागले आहेत. आता काय राहिले? UPSC सारखी संस्था जर अशी वागत असेल तर त्या संस्थेवर सुद्धा दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. पूजा खेडकरला पदावरुन बाहेर काढून तिला जन्मठेपेपर्यंत पोहोचवले पाहिजे. पुन्हा असा कोणी गुन्हा करणार नाही, अशाप्रकारची व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती.