IAS Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयाचा दिलासा; काय घडलं कोर्टात?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
IAS Pooja Khedkar Case: आयएएस पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना पुणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
पुणे, (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : आपल्या प्रशिक्षण कार्यकाळात रूबाब केल्याने वादात सापडलेल्या IAS पूजा खेडकर यांचं संपूर्ण कुटुंबच आता गोत्यात आलं आहे. एकीकडे युपीएससीने पूजा खेडकर यांना नोटीस पाठवली आहे. तर दुसरीकडे पोलीसही पूजा खेडकर यांच्या आईवडिलांच्या मागावर आहेत. या प्रकरणात मनोरमा खेडकर यांना आधीच अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दिलीप खेडकर यांना दिलासा मिळाला आहे.
दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर
मुळशी तालुक्यातील दडवली गावातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या दिलीप खेडकर यांना आज पुणे सत्र न्यायालयाने दिसाला दिला आहे. 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजित मरे यांनी 25 जुलैपर्यंत अटी शर्तीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.
मनोरमा खेडकर यांना अटक
मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांना पौड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिलीप खेडकर यांनाही अटक होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे अटक टाळण्यासाठी त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर शुक्रवारी कोर्टात सुनावणी झाली. ऍड शहा यांनी खेडकर यांच्या वतीने युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दिलीप खेडकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.
advertisement
काय आहे प्रकरण?
मुळशी तालुक्यात मनोरमा खेडकरने बंदुक दाखवत शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरसह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलीस यासंदर्भात मनोरमा खेडकरची चौकशी करण्यासाठी आले होते. पण त्यांच्या घरी कुणीही नसल्याने पोलीस परत गेले. त्यानंतर मनोरमा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर आली होती. काल तिला महाडमधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 19, 2024 8:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
IAS Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयाचा दिलासा; काय घडलं कोर्टात?