Vishalgad Violence : 'विशाळगडावर संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांनी दंगा केला'; आंबेडकरांचा गंभीर आरोप, म्हणाले..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Vishalgad Violence : विशाळगडावर झालेल्या हिंसाचारानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केला आहे.
नांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : विशाळगडावर संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यानी दंगा केला, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. नांदेडमध्ये बोलताना आंबेडकर यांनी हा आरोप केला. आगामी विधानसभा निवडणुका पाहून जाणूनबुजून हा प्रकार केल्याचे आंबेडकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा गटाला मतदान करण्याचे आवाहन ज्या मौलवींनी केले होते. त्या मौलवींनी या पक्षांच्या समोर जाऊन आंदोलन करावे, असेही आंबेडकर म्हणाले.
ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण बाचव यात्रा
ओबिसीचे आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 26 जुलैपासून प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. कोल्हापूर येथून यात्रेला सुरुवात होणार असून 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी छ्त्रपती संभाजी नगर येथे यात्रेचा समारोप होणार आहे. ओबीसीचे आरक्षण एक जीआर काढून लागू करण्यात आले आहे. जीआर कधीही रद्द करता येऊ शकतो. त्यामुळे आरक्षण बचाव यात्रा काढत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
advertisement
मराठा आणि ओबीसी यांची नामांतरासारखी
नामांतर वेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती. तशीच परिस्थिती आता मराठा आणि ओबीसीमध्ये निर्माण झाली आहे हे मी दुर्दैव समजतो, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
विशाळगडावर नेमकं काय घडलं?
14 जुलै रोजी माजी खासदार आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी राजे यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी हाक दिली होती. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, संभाजीराजे हे समर्थकांसह गडावर पोहोचण्यापूर्वीच रवींद्र पडवळांच्या चिथावणीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात गजापुरात हिंसा केली होती. रवींद्र पडवळसह कोल्हापुरातील बंडा साळोखे यांच्यावर ही जमावाला भडकवण्याचा आरोप आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
July 19, 2024 7:59 PM IST
मराठी बातम्या/नांदेड/
Vishalgad Violence : 'विशाळगडावर संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांनी दंगा केला'; आंबेडकरांचा गंभीर आरोप, म्हणाले..