बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक
आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा अटक केल्याची माहिती समोर आली आहे. यात बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू आणि शूटर अमन पठाण ही असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिलीय. इतर दोघांमध्ये स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
आधी दोघांना अटक
आयुषची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली होती. यात प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे यांचा समावेश होता. आता या प्रकरणात आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
कृष्णा आंदेकर अजूनही फरार
दरम्यान, मागील तीन दिवस पोलिसांनी आरोपींवर पाळत ठेवली. गणेश उत्सव आणि आयुषचा अंत्यसंस्कार या दोन्ही घटना शांततेत पार पाडल्या. यानंतर आंदेकर टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पण या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर अद्याप फरार आहे.