आगामी पुणे महानगरपालिक निवडणुकांसाठी आंदेकर कुटुंब इच्छुक आहे. त्यामुळे आंदेकर कुटुंब पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. आज निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी तिघेही तुरूंगाबाहेर आले होते. या वेळी आंदेकरचा माज थोडाही कमी झालेला दिसला नाही. जेलबाहेर आल्यानंतर अर्ज भरायला जाताना आंदेकर माध्यमांसमोर व्हिक्टरी साईन दाखवत गेला. एवढच नाही तर त्याने या वेळी जोरदार घोषणा देखील दिल्या आहेत.
advertisement
गुंड आंदेकरची जोरदार घोषणाबाजी
न्यायालयाच्या आदेशानुसार आंदेकर कुटुंबाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस एस्कॉर्ट व्हॅन उपलब्ध करून दिली होती. एवढच नाही तर तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. या वेळी बंडू आंदेकर ज्यावेळी व्हॅनमधून उतरला त्यावेळी त्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला होता. बाहेर येताच बंडू आंदेकर हात वर केला आणि व्हिक्टरी साईन दाखवली. त्यानंतर आंदेकर नेकी का काम , आंदेकर का नाम अशा घोषणा देत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेला. सोनाली आणि लक्ष्मी यांचा चेहरा स्कार्फने झाकला होता.
Watch Video
गुंड आंदेकर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार?
न्यायालयाने लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्याचवेळी त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. त्यामुळे या तिघांनाही सध्या न्यायालयीन कोठडीत राहावे लागत आहे. जामीन नाकारण्यात आल्याने आंदेकर कुटुंबाच्या अडचणी वाढल्या असल्या, तरी निवडणूक लढवण्याचा त्यांचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर आंदेकर कुटुंबाने पोलीस संरक्षणात फॉर्म भरला असून निवडणूक आंदेकर कुटुंब जेलमधून लढवणार आहे. आंदेकर कुटुंबाने जरी फॉर्म भरला असला तरी ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप समोर आलेले नाही. येत्या काळात आंदेकर कुटुंबाचा निवडणूक प्रचार कसा होणार आणि मतदारांचा प्रतिसाद काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
