बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अजित पवारांनी बारामतीत एकला चलो रे अशी भूमिका घेतल्याने त्यांनी सर्वच ठिकाणी अमेदवार जाहीर केले होते. बारामती नगरपरिषद निवडणुकीकरिता नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाकरिता 300 हून अधिक विक्रमी अर्ज दाखल झाले होते. पालिका निवडणुकीमध्ये अपक्षांकडून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या कमी करणे हे आव्हान होते. मात्र अजित पवार गटाला मोठे यश मिळाले असून निवडणुकीपूर्वीच आठ नगरसेवक निवडून आले आहेत.
advertisement
कोणत्या प्रभागातून कोण निवडून आले?
- प्रभाग क्रमांक 2 अ मधून अनुप्रिति तांबे
- प्रभाग क्रमांक 5 अ मधून किशोर मासाळ
- प्रभाग क्रमांक 6 अ मधून अभिजीत जाधव
- प्रभाग क्रमांक 8 अ मधून श्वेता नाळे
- प्रभाग क्रमांक 17 ब मधून शर्मिला ढवान
- प्रभाग क्रमांक 20 ब मधून आफ्रिन बागवान
- प्रभाग क्रमांक 18 अ मधून अश्विनी सुरज सातव
- प्रभाग क्रमांक 2 ब मधूनअनुप्रिता रामलिंग तांबे डांगे
नगरसेवक पदाच्या आठ जागा अजित पवार गटाच्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 77 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. तर नगराध्यक्ष पदाकरता उभ्या असणाऱ्या दोन सदस्यांनी आपली उमेदवारी मागे घेतले आहेत.
बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची बारामची नगरपरिषदेवर सत्ता आहे. यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील काही जागी नगराध्यक्ष पदांसाठी उमेदवार दिले आहेत. आज अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर असून अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठे यश मिळाले आहे. आज बारामतीत त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. शहरातील सिद्धेश्वर मंदिर येथे पवार यांची सभा होणार आहे.
हे ही वाचा :
