TRENDING:

पैशाचा पाऊस पाडतो म्हणत पूजेला बसवलं अन् बारामतीतील महिलांसोबत घाणेरडं कांड, भोंदूबाबाला कोर्टानं शिकवला धडा

Last Updated:

आरोपी मिलिंद जाधव याने बारामती परिसरातील महिलांना "पैशांचा पाऊस पाडून श्रीमंत करून देतो" असे स्वप्न दाखवले होते. त्यासाठी त्याने एका अघोरी पूजेचे आयोजन केले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : मिलिंद जाधव नावाच्या एका भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे खोटे आमिष दाखवत अनेकांची फसवणूक केली. आमिष दाखवून महिलांची आर्थिक फसवणूक आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या भोंदूबाबाला बारामती न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. मिलिंद मदन जाधव (वय ५०, रा. गुहागर, जि. रत्नागिरी) असे या दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी या प्रकरणी आरोपीला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत ४ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
भोंदूबाबाला बारामती न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली (प्रतिकात्मक फोटो)
भोंदूबाबाला बारामती न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

अघोरी पूजा अन् महिलांचा छळarres

आरोपी मिलिंद जाधव याने बारामती परिसरातील महिलांना "पैशांचा पाऊस पाडून श्रीमंत करून देतो" असे स्वप्न दाखवले होते. त्यासाठी त्याने एका अघोरी पूजेचे आयोजन केले होते. या पूजेच्या नावाखाली त्याने महिलांना अनुचित पद्धतीने बसवून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केला. तसेच पूजेच्या साहित्यासाठी आणि विधीसाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळून आर्थिक फसवणूकही केली होती. अखेर त्याला याची शिक्षा मिळाली.

advertisement

या प्रकरणी पीडित महिलांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध शारीरिक अत्याचारासह 'महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये' गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले.

न्यायालयाचा निकाल

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Youtube वर पाहिलं अन् निर्णय घेतला, नोकरी करत सुरू केला थंडगार पेयाचा व्यवसाय, आता डबल कमाई
सर्व पहा

सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी या खटल्यात सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला दोषी ठरवले. फसवणुकीसाठी या भोंदूबाबाला २ वर्षे शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड सुनावण्यात आला. तर, जादूटोणा कायद्यान्वये ४ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड सुनावण्यात आला. भोंदूगिरी करणाऱ्यांविरुद्ध हा एक महत्त्वाचा निकाल मानला जात असून, नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पैशाचा पाऊस पाडतो म्हणत पूजेला बसवलं अन् बारामतीतील महिलांसोबत घाणेरडं कांड, भोंदूबाबाला कोर्टानं शिकवला धडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल