पोलिस कॉन्स्टेबलच्या दुचाकीला धडक देऊन पळालेली गाडी स्वीफ्ट डीझायर कार असून पोलिसांनी कार चालकाला पुण्यातून कारसह ताब्यात घेतलं आहे. हा अपघात जेव्हा घडला तेव्हा त्याच भागातून पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार जाताना सीसीटीव्हीमधे दिसली होती. जी मुंबईतून अपघातग्रस्त होऊन आली होती. त्यामुळे त्या इनोव्हा कारने अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांनी आधी व्यक्त केला होता. मात्र पुढे तपासात स्वीफ्ट कारने धडक दिल्याने पोलिस कॉन्स्टेबल समाधान कोळींचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून, चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री पावनेदोन वाजता हा अपघात घडला आहे. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना समोरून वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला, अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
