TRENDING:

कारमध्ये 2 पुरुष 2 महिला, पुण्याकडे येताना वरंधा घाटात घडलं भयंकर, भरधाव कार पलटली

Last Updated:

Pune Varandha Ghaat Accident: पुणे जिल्ह्यातील भोर-महाड मार्गावर असलेल्या वरंध घाट परिसरात शनिवारी सकाळी एका कारचा भीषण अपघात झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर-महाड मार्गावर असलेल्या वरंध घाट परिसरात शनिवारी सकाळी एका कारचा भीषण अपघात झाला. घाटातील कोंढरी गावाच्या हद्दीत एका धोकादायक वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याकडेला असलेल्या चारीत जाऊन पलटी झाली. या अपघातात कारमधील चार प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार महाडहून भोरच्या दिशेनं जात होती. वरंध घाटातून जात असताना कोंढरी गावाच्या हद्दीत एका तीव्र वळणावर चालकाला वेगाचा अंदाज आला नाही. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या चारीत जाऊन कोसळली. वेग जास्त असल्याने कार पलटी होऊन तिचं मोठं नुकसान झालं आहे.

advertisement

चार प्रवासी जखमी

या कारमध्ये एकूण चार जण प्रवास करत होते, ज्यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सुदैवाने, कार चारीत उलटूनही मोठी जीवितहानी टळली. मात्र, या अपघातात चौघेही जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला असून वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे.

स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

अपघात झाल्याचं समजताच कोंढरी गावातील स्थानिक नागरिक आणि त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून जखमींना कारबाहेर काढले आणि तत्काळ जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
कारमध्ये 2 पुरुष 2 महिला, पुण्याकडे येताना वरंधा घाटात घडलं भयंकर, भरधाव कार पलटली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल