नागपूर - हडपसर - नागपूर विशेष गाडी: गाडी क्रमांक ०१२२१ नागपूरहून २६, २९, ३१ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता हडपसरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१२२२ हडपसरहून २८, ३० डिसेंबर तसेच १ आणि ४ जानेवारीला दुपारी ३:५० वाजता नागपूरसाठी रवाना होईल.
advertisement
पुणे - नागपूर - पुणे विशेष गाडी: गाडी क्रमांक ०१४१९ पुणे रेल्वे स्थानकावरून २७, २९, ३१ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजता सुटेल, जी दुसऱ्या दिवशी दुपारी २:०५ वाजता नागपूरला पोहोचेल. याउलट, गाडी क्रमांक ०१४२० नागपूरहून २८, ३० डिसेंबर तसेच १ आणि ४ जानेवारी रोजी दुपारी ४:१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता पुण्याला पोहोचेल.
राणी कमलापती - हडपसर - राणी कमलापती विशेष गाडी: मध्य प्रदेशातील राणी कमलापती स्थानकावरून गाडी क्रमांक ०२१५६ ही २७ डिसेंबर, ३ आणि १० जानेवारी रोजी सकाळी ८:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२:१० वाजता हडपसरला येईल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०२१५५ हडपसरहून २८ डिसेंबर, ४ आणि ११ जानेवारीला सकाळी ७:५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११:४० वाजता राणी कमलापती स्थानकावर पोहोचेल. प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाची नोंद घेऊन आपले आरक्षण निश्चित करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
